Post Office PPF scheme पोस्ट ऑफिसची सर्वोत्कृष्ट योजना, 150 रुपयांची बचत आणि वीस लाखापर्यंत परतावा मिळणार.
जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ स्कीममध्ये 150 रुपये गुंतवले तर तुम्हाला 20 वर्षांमध्ये 20 लाख जास्त अतिरिक्त जमा केला जाऊ शकतो. रोजच्या खर्चातून काही व्यर्थ खर्च करणे 100, 150. अशी बचत होऊ शकते, असे अनेकांचे म्हणणे आहे. हे पैसे तुम्ही सरकारच्या बचत योजनांमध्ये टाकले तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.
प्रत्येकाची परिस्थिती ही समान नसते त्यामुळे लोक आपआपल्या क्षमतेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक करतात. गुंतवणूकीसाठी काही जण उच्च परताव्यासाठी जोखिम घेतात तर काही जोखिम न घेता गुंतवणूक करतात. जोखिम न घेता तसेच सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट ऑफिस हा बेस्ट पर्याय ठरतो. पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.
आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथं धोका नगण्य आहे आणि रिटर्न्सही चांगला आहे. आम्ही पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Post Office PPF scheme) बद्दल बोलत आहोत. ही योजना खूप लोकप्रिय आहे. विशेषतः सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनीही यात गुंतवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत अगदी माफक गुंतवणुकीवरही दीर्घ मुदतीत लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज फक्त 150 रुपये गुंतवावे लागतील.
या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असला, तरी तुम्ही तो 5-5 वर्षांसाठी दोनदा वाढवता येतो. यासोबतच तुम्हाला या स्कीमसह कर सूटही मिळते. या योजनेत तुम्हाला वार्षिक 7.1% व्याज मिळते आणि यामुळे तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
20 लाख रुपयांचा निधी कशाप्रकारे तयार होईल
Table of Contents
जर तुमचे वय 25 वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी गमावू नका. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे उत्पन्न 30-35 हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज 100-150 रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला 45 व्या वर्षी 20 लाख रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त परतावा देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोठ्या गरजा सहज पूर्ण करू शकता.
उदाहरण समजून घ्या
जर तुम्ही पीपीएफमध्ये दररोज 150 रुपयांची बचत केली तर ते मासिक 4500 रुपये होईल. दरमहा 4500 रुपये गुंतवल्यास वार्षिक गुंतवणूक 54 हजार रुपये होईल.
20 वर्षात एकूण गुंतवणूक 10.80 लाख रुपये असेल. वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढीच्या दृष्टीने, यामध्ये, तुमचा निधी 20 वर्षात 20 लाखांपेक्षा जास्त तयार होईल.
पीपीएफमध्ये कर फायदा
PPF योजनेचा मुख्य फायदा हा आहे की ते आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ प्रदान करते. यामध्ये योजनेतील 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.
अशा प्रकारे, पीपीएफमधील गुंतवणूक ‘EEE’ श्रेणीत येते. सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारचे या योजनांना संरक्षण असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षेची हमी असते.
ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा