Roof top solar anudan Yojana application for Maharashtra | घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरता केंद्र सरकारकडून 40% अनुदान

Roof top solar anudan Yojana application for Maharashtra छतावरील सोलर पॅनल लावण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून 40 % अनुदान…! जाणून घ्या त्या विषयी माहिती. सर्वप्रथम आपण पाहिलं तर एक किलोवॅट भार क्षमता असणाऱ्या नागरिकांना किंवा सामान्य नागरिक असतील आणि एक किलोवॅट पर्यंत भार क्षमता असलेल्या नागरिकांना याच्यासाठी अर्ज करता येतो. हे एक किलोवॅट पासून तीन किलोवॅट क्षमते पर्यंत केंद्र शासनाच्या माध्यमातून यासाठी 40 टक्के अनुदान दिले जात आहे. त्यासाठी नवीन दर मंजूर करण्यात आले असून या पोस्टच्या माध्यमातून आपण Roof top solar anudan Yojana यासाठी अर्ज कसा करायचा? तसेच कितीला मिळेल किती टक्के सूट मिळेल. ही सर्व माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

आपल्या देशात वीज निर्मिती साठी नैसर्गिक ऊर्जा संसाधनांचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये सौरऊर्जेला (Solar Energy) प्राधान्य दिलं जात आहे. सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विविध योजनाही राबवल्या जात आहेत. त्यात आता केंद्र सरकारनं आणखी एक महत्वाची योजनी आणली आहे. यामध्ये छतावर सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसवण्यासाठी 40 टक्के अनुदान दिलं जाणार आहे. या योजनेमुळे मासिक घरगुती वीजबिलात मोठी बचत करणं शक्य होणार आहे. तसेच नेट मीटरिंगद्वारे शिल्लक राहणारी वीज वर्षाअखेर महावितरणकडून खरेदी केली जाणार आहे.

Read  Ration Card Opening Process Maharashtra | पिवळे केसरी रेशन कार्ड वाटप सुरू

केंद्र सरकार कडून मिळणार 40% अनुदान. केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या रुफटॉप सौर योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगावॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील (रुफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. यात घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलोवॅटपर्यंत 40 टक्के आणि 3 किलोवॅटपेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) आणि निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना 20 % अनुदान मिळणार आहे.

किंमत किती असेल?

Table of Contents

Read  eKYC for PMKISAN Registered Farmers | पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी कशी करायची?

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणेसाठी 1 किलोवॅट – 46 हजार 820 रू., 1 ते 2 किलोवॅट – 42 हजार 479रू., 2 ते 3 किलोवॅट – 41 हजार 380 रू., 3 ते 10 किलोवॅट 40 हजार 290 आणि 10 ते 100 किलोवॅटसाठी – 37 हजार 020 रुपये प्रति किलोवॅट किंमत जाहीर करण्यात आली आहे. म्हणजेच या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची किंमत 1 लाख 24 हजार 140 रुपये असेल. त्यामध्ये 40 टक्के अनुदानाप्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल आणि संबंधित ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल.

वीजबिलात दरमहा 550 रुपयांची बचत :

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंगद्वारे वर्षाअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदा संबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे.

Read  Aadhaar Seva Kendra | आधार सेवा केंद्र करता अर्ज सुरू

खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड :

सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे. दरमहा वीजबिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अर्ज कोठे करायचा?

महावितरणने रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा आस्थापित करण्यासाठी परिमंडलनिहाय एजंन्सीजची नियुक्ती केली आहे. त्याची यादी आणि ऑनलाईन अर्जा विषयीची माहिती तुम्ही महावितरणच्या  www.mahadiscom.in या वेबसाईटवर पाहू शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

3 thoughts on “Roof top solar anudan Yojana application for Maharashtra | घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरता केंद्र सरकारकडून 40% अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published.

x