eKYC for PMKISAN Registered Farmers | पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी कशी करायची?

eKYC for PMKISAN Registered Farmers – पीएम किसान योजनेच्या नियमावलीत बदल झाल्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यात 11 वा हप्ता जमा होणार…!
तर जाणून घेऊ या काय आहे नियमावलीतील बदल.

पी.एम किसान योजनेचा 10 हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी बोगस कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेतला आहे.

ही बातमी (Central Government) केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे (Farmer) शेतकऱ्यांनी आता ई-केवायसीची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

Read  कृषी कर्ज मित्र योजना | Krishi Karj Mitra Yojana 2021

देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारीला योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून याकरिता दोन महिन्याचा कालावधी शेष राहिलेला आहे.

ई-केवायसी कसे करावे?

eKYC म्हणजे electronic know your custumer एखाद्या व्यक्तीची ओळख इलेक्ट्रॉनिकली पडताळून पाहणे म्हणजेच ई- केवायसी आता eKYC करायची असेल तर www.pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे. त्यानंतर पी. एम. किसान योजनेची अधिकृत वेबसाईट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

Read  Pip Line Subsidy Online Application 2022 | पाईपलाईन अनुदान ऑनलाइन अर्ज 2022

वेबसाइट ओपन झाल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला लाल अक्षरांमध्ये एक सूचना दिसेल ती अशी की eKYC is mandatory for PMKISAN Registered farmers, pls click ekyc option in former corner for aadhar based OTP authentication and for biometric authentication contact nearest CSC centres याचा अर्थ तुम्ही तर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

आता केवायसी करण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे तुमचा फोन नंबर आधार कार्डला लिंक असेल तर तुम्ही आधार बेस्ट केवायसी करू शकता.

त्यासाठी फार्मर कॉर्नर मध्येही केवायसीला क्लिक करायचे आहे. मोबाईल नंबर, आधार कार्ड सिलिंग नसेल तर सीएससी केंद्रावर जावून कागदपत्र देऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

आधारकार्ड वापरून eKYC कसे करायचे?

फार्मर कॉर्नरवरती eKYC ला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आधार केवायसी नावाचे एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

Read  One Nation, One Registration ULPIN | केंद्र सरकार 'वन नेशन, वन रजिस्ट्रेशन प्रोग्राम'

त्यामध्ये सुरुवातीला आधार कार्ड क्रमांक त्यानंतर समोरच्या बॉक्समधील अक्षरे आणि अंक आहेत तशी टाकायची आहेत.

त्यानंतर search या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल.

त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक आहे, तोच येथे टाकायचा आहे. त्यानंतर Get Otp यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर मोबाईलवर OTP नंबर येईल तो OTP येथे submit करायचा आहे. त्यानंतर submit for Auth यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर EKYC is successful submitted असा sms दिसेल. याचाच अर्थ ekyc submitted यशस्वी झाला आहे.

यादरम्यान invalid असा पर्याय समोर येत असेल तर काही दिवसांनी ekyc करायचे किंवा CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रे जमा करून ekyc करून घ्यावे लागणार आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.

x