Hawaman Andaj Panjab Dakh 30 नोव्हेंबर पासून ते 2 डिसेंबर पर्यंत मेघगर्जनेसह राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वारे जोरदार असण्याची शक्यता आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रासह संलग्न मराठवाडा यामुळे प्रभावित होऊ शकतो. ठाणे, मुंबई सहित काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. अवकाळी पावसाची शक्यता पुन्हा एकदा राज्यामध्ये वर्तवण्यात येत आहे.
अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरामध्ये निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबामुळे राज्यात पावसा करिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे 30 नोव्हेंबर पासून पुढे सलग 3 दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याने सुद्धा कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये विविध जिल्ह्यांना इशारा जारी केला आहे. हवामान खात्याने मंगळवारी मुंबईसह ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे औरंगाबाद अहमदनगर उस्मानाबाद लातूर कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली आणि सातारा या 16 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या सर्व ठिकाणी मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे.
त्यामुळे संबंधित या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे असा सल्ला सुद्धा हवामान खाते व पंजाब डख यांच्याकडून देण्यात आला आहे.