Hawaman Andaj Today हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या पश्चिम महाराष्ट्र यामधील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्व विदर्भात सुद्धा उद्या आणि परवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर देखील पावसाचे संकट असू शकते विदर्भात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
त्या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पावसामुळे आर्थिक फटका बसलेला आहे अशा संकटात पुन्हा शेतकरी सापडू शकतात खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बऱ्याच भागामध्ये पाऊस झालाच नाही आणि त्यामुळे पेरणी लांबली वेणी झाल्यानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील झाली या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका हा विदर्भ व मराठवाड्याला बसला आहे
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा अतिवृष्टीने काढून घेतला. आता अवकाळी पावसाची शक्यता रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा राज्यांमध्ये अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा गहू, हरभरा पिकांना बसणार आहे.