हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि सरस्वती प्राथमिक कन्या शाळेत बक्षीस वितरण सोहळा संपन्न

मलकापूर शिक्षण समितीद्वारा संचालित हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि सरस्वती प्राथमिक कन्या शाळा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक 8 जानेवारीला स्नेहसंमेलन ,दिनांक 9 जानेवारीला पालक मेळावा व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती व स्वर्गीय हिराबाई संचेती यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी दहावी व बारावीत यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थिनी ,जिल्हा क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थिनी, तसेच विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थिनींना पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मलकापूर शिक्षण समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री चैनसुखजी संचेती यांनी भूषविले अभ्यासासोबतच खेळ, कला ,विज्ञान यांना देखील महत्त्व देणे आवश्यक आहे असे त्यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थिनींना सांगितले .प्रमुख वक्ते म्हणून मलकापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री एन. जे .फाळके साहेब हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले व यशस्वी होण्यासाठी वर्ग 8 ते 12 पर्यंत अत्यंत मेहनत घेणे आवश्यक आहे ,विद्यार्थ्यांनी किमान पाच तास रोज अभ्यास करावा, मोबाईलचा सदुपयोग करावा असेही त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले. कार्यक्रमास मलकापूर शिक्षण समिती चे पदाधिकारी व संचालक सदस्य श्री राजेशजी महाजन ,श्री अशोक काका अग्रवाल, श्री एलाबादकर सर, श्री रमेशजी सदानी ,श्री कमल किशोरजी टावरी ,श्री शक्ती सिंह राजपूत ,श्री लखानीजी श्री विजयकुमारजी संचेती, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते “नंदादीप” या हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गाढे व सौ पोळ यांनी केले. प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ ममताताई पांडे यांनी केले .व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा परिचय सौ जोशी यांनी दिला .आभार प्रदर्शन शाळेच्या पर्यवेक्षिका सौ खडसे मॅडम यांनी केले.सरस्वती प्राथमिक कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटील उपस्थित होत्या.कार्यक्रमास पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले कार्यक्रमाची सांगता कु जोशी यांनी पसायदानाने केली.

Leave a Comment