मलकापूर:- २२ जानेवारी रोजी श्रीराम प्रभुंच्या मुर्तीची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊ घातला आहे. त्यानिमित्त भ्रातृमंडळ येथे नवीन श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने १९ जानेवारी रोजी भव्यशोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
अयोध्या येथील श्रीराम प्रभुंच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने भ्रातृमंडळ येथे नवीन श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने 19 जानेवारी रोजी दुपारी 4.00 वाजता जुन्या गावातील दुर्गानगर येथील श्रीराम प्रभुंचे मंदीर पासून ते भ्रातृमंडळ पर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य शोभा यात्रेमध्ये भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक सर्वश्री रामभक्त मलकापूर यांनी केले आहे.