पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीतुन आदर्श व निर्भीड विचारांचा वारसा जोपासावा – डॉ.अरविंद कोलते

मलकापुर:- तालुक्यातील ग्राम नरवेल येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली

आज दि ६ जानेवारी रोज शनिवारला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मलकापूर शहर व ग्रामीण पत्रकार यांच्या वतीने “पत्रकार दिन ” म्हणून ग्रामपंचायत ग्रामसचिवालय नरवेल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सविस्तर वृत्त असे की मराठी पत्रकारितेचा पाया भक्कमपणे उभारण्यासाठी ज्यांनी मोलाचे कार्य केले त्या दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणपर्व हेतूने 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्याचा कार्यक्रम नरवेल ग्रामपंचायत ग्रामसचिवालय येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ.अरविंद कोलते हे होते तर प्रमुख उपस्थितीत प्रा.अनिल खर्चे, ज्येष्ठ पत्रकार हरिभाऊ गोसावी, हनुमान जगताप , भारतीय पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांच्या प्रतिमेस दीप प्रज्वलन करून हार अर्पण करण्यात आला तसेच दिवंगत पत्रकार गुलाबराव गावंडे,अतुल होले, कैलास मिरगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अध्यक्षीय भाषणात डॉ अरविंद कोलते यांनी योग्य असे मार्गदर्शन करताना सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनमान अवघ्या चौतीस वर्षाचे होते मात्र जांभेकर यांच्या कामाची पद्धत, त्यांच्या विचारांचा ठेवा, आणि समाजात प्रबोधन घडून आणण्यात त्यांचा मोलाच वाटा आहे तसेच लोकशाही असलेल्या भारत देशात पत्रकारिता हा चौथा स्तंभ मानला जातो कारण प्रत्येक समस्या ही पत्रकार लेखनीने माध्यमातून सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो आणि कुठलेही समस्या पत्रकारांनी जर आपल्या लेखनी माध्यमातून मांडली तर त्याची दखल शासन दरबारी निश्चित च घ्यावी लागते अशी मोठी ताकद तुमच्या पत्रकारांच्या लेखनीमध्ये असून यापुढेहीसतुमच्या लेखणीतून आदर्श व निर्भिड विचारांना वारसा देण्याचे काम करावे अशा शुभेच्छा सर्व पत्रकारांना देण्यात आल्या यावेळी श्रावण पाटील तालुका अध्यक्ष, विश्वनाथ पूरकर तालुका उपाध्यक्ष, पत्रकार नारायण पानसरे, धीरज वैष्णव, प्रवीण राजपूत, कैलास काळे, गौरव खरे ,समाधान सुरवाडे, विनायक तळेकर, सुधाकर तायडे, सुनील देशमुख, बिस्मिल्लाखान पठाण ,विनोद व्यवहारे, भाऊराव व्यवहारे, विजय भगत, श्रीकृष्ण तायडे, धर्मेंद्रसिंह राजपूत, अनिल श्रीखंडे ,गणेश पाटील, सतीश दांडगे, नथ्थुजी हिवराळे, विलास खर्चे ,बाळू राठोड, रामेश्वर गोरले, अरविंद पाटील ,गिरीश कोलते, संदीप कोलते,, विठ्ठल धाडे ,भारत सावळे ,उमेश सावळे, गजानन भारंबे ,निलेश सोनवणे ,विजय जाधव, यांची उपस्थिती असुन सूत्रसंचालन गजानन ठोसर तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पुरकर यांनी केले तद्नंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Comment