महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन;

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; 39 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मलकापूर:- महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन 2 जानेवारी रोजी हनुमान सेनेच्या वतीने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले.

नेहमीच सामाजिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या हनुमान सेनेच्या वतीने ग्रामीण पोलिसात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरामध्ये पोलीस कर्मचारी तसेच इतर एकूण 39 रक्तदात्यांनी रक्तदान केले. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी, डॉ. अरविंद कोलते, पशुवैद्यकीय फोपसे यांच्या उपस्थिती रक्तदान शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये विशेष असे की 39 लोकांनी रक्तदान केले त्याच वेळी याच रक्तदानामधून दहा रुग्णांना रक्त देण्यात आले. यावेळी अल्पेश फिरके ,प्रकाश कोळी, रामेश्वर वाघमारे, विक्रम सिंह राजपूत, संदीप राखुंडे, स्वप्नील कावळे, रघुनाथ जाधव, श्याम कुमार राजगुरे ,विनोद वाघोदे ,गणेश सावे ,संदीप खोमने,दिलीप तडवी, सौ.नीता मोरे ,सौ.स्वाती खर्चे ,आशिष क्षीरसागर, बादल पाटील ,राजेंद्र मोरे ,विशाल इंगळे, अखिल शहा अली शहा, सौरभ चिकटे ,अक्रम शहा लुकमान शहा,शेख युसुफ शेख इस्माईल, अजित किणगे,अक्षय वराडे, सचिन कवळे,प्रफुल्ल भारंबे, योगेश निकम, नरेश ठाकूर, जगन्नाथ काटे, शेख कलीम शे वहिद ,आकाश सपकाळ,आकाश तायडे आदी रक्तदाता उपस्थित होते.

Leave a Comment