Jameen kharedisathi 100% Anudan Yojana | जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना
Table of Contents
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध भूमिहीन शेतमजुरांना शेत जमिनीचे वाटप करण्याकरिता सुधारित तरतुदी पैकी उपरोक्त रुपये 12,50,00,000 /- तकी तरतूद वितरित करण्यात आली आहे आता अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सन्य सनियंत्रण प्रणालीवर वितरित करण्यात आलेली सुधारित तरतुदीच्या मर्यादेतील उर्वरित रुपये12, 50,00,000/- ( अक्षरी रुपये बारा कोटी 50 लक्ष फक्त ) खर्च करण्यासाठी याद्वारे मान्यता करण्यात येत आहे अनुसूचित जाती व नवबद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन कुटुंबीयांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि साबळे स्वाभिमानी योजनेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमानी योजना जमीन खरेदी करण्यासाठी आता मिळेल शंभर टक्के अनुदान अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील स्वाभिमानी कुटुंबीयांसाठी चार एकर जमिनीसाठी 20 लाख तर दोन एकर बागायती जमिनीसाठी 16 लाख रुपये इतके अनुदान राज्य सरकार देणार आहे. विधवा आणि परी तक्त महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मान्य मानण्यात आला असून त्यांना आता या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे.
स्वाभिमानी योजनेकरिता अटी व पात्रता :-
योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्याचे किमान वय 18 व कमाल वय 60 वर्षे निश्चित केले आहे.
लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र रेषेखाली शेतमजूर असावा.
परितक्ता विधवा स्त्री यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी दहा वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
कुटुंबाने विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
जमीन खरेदी करताना प्रति एकरी तीन लाख रुपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेमध्ये खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे त्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही
कर्जफेडीची सुरुवात कर्ज मुदतीनंतर दोन वर्षानंतर सुरू होणार आहे.
जमीन खरेदी करताना प्रति एकरी तीन लाख रुपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समिती देण्यात आलेली आहे.
स्वाभिमानी योजनेकरिता अर्जासाठी लागणारी कागदपत्रे :-
भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
वय 60 वर्षाखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
पसंती बाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र.
रहिवाशी दाखला रेशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड झेरॉक्स निवडणूक कार्ड झेरॉक्स.
अर्जदाराने अनुसूचित जाती या प्रवर्गातील असल्याबाबत जातीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहित प्रमाणपत्र.
अर्ज विहित नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा.
Jameen kharedisathi 100% Anudan Yojana | जमीन खरेदीसाठी 100% अनुदान योजना | दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना.