Janani Suraksha Yojana 2023 | जननी सुरक्षा योजना 2023.
आपण आजच्या लेखामध्ये एक महत्त्वपूर्ण योजनेबद्दल चर्चा करणार आहोत. या योजनेचे नाव जननी सुरक्षा योजना 2023 आहे. या योजनेबद्दल आपण या लेखांमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत यासाठी रजिस्ट्रेशन कुठे करावे, यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती इत्यादी सर्व माहिती पुढे पाहणार आहोत. ही योजना भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राबविल्या जाते या योजनेद्वारे दारिद्र्यरेषेखालील महिलांसाठी प्रसूतीसाठी एक हजार रुपयांची सरकारकडून मदत दिली जाते. या योजनेची सुरुवात भारत सरकारने 12 एप्रिल 2005 पासूनच चालू केली होती या योजनेवर सरकार दरवर्षी सोळाशे कोटी रुपये खर्च करते आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना मदत करते . ही योजना केंद्र सरकार ने चालू केली आहे या योजनेमधून गरीब अनुसूचित जाती जमाती यांतील स्त्रिया किंवा गरीब असणाऱ्या स्त्रियांना सरकार महिलांच्या प्रसूतीसाठी एक हजार रुपयांचे आर्थिक मदत करते. चला तर पुढे पाहूया या योजनेची उद्दिष्टे काय आहे ते.
1) जननी सुरक्षा योजनेची उद्दिष्टे काय आहेत ?
या योजनेद्वारे सरकारकडून महिलांना अनुदान दिले जाते. देशामध्ये दारिद्र्यरेषेखालील गर्भवती महिलांना या योजनेद्वारे प्रसूतीसाठी अनुदान दिले जाते. ही एक महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेद्वारे महिलांच्या गर्भधारणे दरम्यान तसेच बाळाच्या जन्म दरम्यान दोघांनाही संरक्षण दिले जाते आणि या योजनेद्वारे बाळावर चांगले उपचारही होऊ शकतात. यामुळे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे टेन्शन नसते व त्या निरोगी बाळाला जन्म देऊ शकतात आणि त्या स्वतःही निरोगी राहू शकतात व या योजनेमार्फत त्यांचा चांगला उपचार होऊ शकतो या योजनेतून मिळणारे राशी महिलाच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून ट्रान्सफर होते जेणेकरून बाळाच्या जन्माच्या दरम्यान तिच्या बाळाला पुरेसे पोषण मिळाले पाहिजे. या योजनेतून महिलांना प्रसूतीमध्ये सुरक्षितता यावी असे सरकारचे धोरण आहे ही योजना मुख्यतः गरीब किंवा दारिद्र रेषेखालील महिलांसाठी सरकारकडून राबविल्या जात आहे.
2) जननी सुरक्षा योजनेअंतर्गत स्त्रियांना कोणते लाभ मिळतील.
जननी सुरक्षा योजना अंतर्गत योजनेसाठी नोंदणी केलेल्या महिलांना त्यांचे सिजेरिअर शस्त्रक्रिया झाली तर त्या महिलेला 1500 रुपये अशी मदत केली जाते त्यातून ते गोळ्या औषधांचा खर्च अथवा इतर खर्च करू शकतात. ही रक्कम त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा केली जाते. जर दारिद्र रेषेखालील कुटुंबातील लाभार्थी महिलांना त्यांची घरी प्रस्तुती झाली अशावेळी त्या महिलेस प्रसुतीच्या सात दिवसाच्या आत पाचशे रुपयांचे अनुदान सरकारकडून दिले जाते ही रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होते. जननी सुरक्षा योजना या योजनेमार्फत कोणत्याही लाभार्थी स्त्री ची प्रसूती सरकारी दवाखान्यामध्ये किंवा खाजगी दवाखान्यांमध्ये झाली तर त्या महिलेस शासनाकडून सहाशे रुपये असा लाभ दिला जातो.
जननी सुरक्षा योजनेत लाभार्थी महिला ही सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा नामांकित खाजगी रुग्णालयामध्ये प्रसुती झाली तर लाभार्थी महिलेला सात दिवसाच्या सातशे रुपये असा लाभ शासनाकडून दिला जातो ही रक्कमही लाभार्थी स्त्रीच्या बँकेमध्ये जमा होते.
3) जननी सुरक्षा योजनेचे फायदे काय आहेत.
या योजनेचे खूप फायदे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत . या योजनेमार्फत सुरक्षितपणे प्रसूती होते त्यामुळे बाळ व माता या दोघांच्या जीवाला धोका कमी असतो. या योजनेमार्फत गरीब कुटुंबातील महिलांना म्हणजेच दारिद्र्यरेषेखालील असलेल्या कुटुंबातील महिलांना प्रसूतीसाठी प्रोत्साहन म्हणून या योजनेतून त्यांना अनुदान मिळते. या योजनेमुळे अनुसूचित जाती जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील महिलांना सुरक्षितपणे उपचार देऊन माता मृत्यू आणि मूलमृत्यू याचे प्रमाण कमी करणे व त्यांना सुरक्षित उपचार देणे असा आहे.
या योजनेमुळे लोक हे दवाखान्यामध्ये प्रसूती करणे वाढवतील वयाचे प्रमाण या योजनेमुळे वाढेल कारण हे सोयीस्कर आहे व याने माता व बालकाच्या जीवाला धोका कमी होते . या योजनेदरम्यान मातेने पुत्राला जन्म दिल्यास पुत्रात जन्मानंतरच एखादी समस्या समोर आली तर त्याचा निशुल्कपणे शासनाकडून इलाज केले जाते. या योजनेमधून अनुदान हे ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांना चौदाशे रुपये असे अनुदान दिले जाते तर शहरातील राहणाऱ्या महिलांना हजार रुपये असे अनुदान दिले जाते. या योजनेद्वारे जेव्हा महिला गरोदर असतात त्यादरम्यान आणि प्रसूतीनंतर बाळाची चांगली काळजी व्हावी यासाठी स्त्रियांची मदत करते व त्यांना मुलासाठी व आईसाठी काय चांगले आहे हे देते. लाभार्थी महिलेची जर सामान्य किंवा सिझेरियन प्रसूती झाली असता त्या महिलेला सर्व उपचार पद्धती हॉस्पिटलमध्ये राहणे जेवण असे सर्व विनामूल्य दिले जाते व सर्व औषधेही विनामूल्य दिली जातात. या योजनेतून उद्देश हा आहे की दारिद्र्यरेषेखालील महिलांनी या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यास त्यांना लाभ होईल हाच उद्देश सरकारचा आहे. या योजनेअंतर्गत आपण खालील आरोग्य संस्थांमध्ये ग्रामीण भागात लाभ घेऊ शकतो. प्राथमिक आरोग्य केंद्र या मार्फतही लाभ घेऊ शकतो प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याही मार्फत लाभार्थी महिला जननी सुरक्षा योजना चा लाभ घेऊ शकतात ग्रामीण रुग्णालयांमध्ये ही त्यांना उपचार या योजनेमार्फत मिळू शकतो उपजिल्हा रुग्णालय ही त्यांचे उपचार करू शकतो.
शहरी भागातील आरोग्य संस्थांमध्येही यांचा उपचार व या योजनेचा लाभ घेऊ शकतात जसे नागरिक कुटुंब कल्याण केंद्र यामधूनही यांना लाभ मिळू शकतो शासकीय अनुदानित रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये ही स्त्रियांचा इलाज केल्या जाऊ शकतो. आपल्या राहत्या एरियानुसार महानगरपालिका व नगरपालिका यांच्या क्षेत्रातील आरोग्य केंद्र यामध्येही महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात.