Korfad कोरफड Aloe Vira

घर बसल्या आपण कोरफड korfad ची लागवड करून दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकता यासाठी वर्षभर यामध्ये तुम्हाला फक्त 50 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत

Korfad कोरफडचे फायदे

जर आपण घरी बसून कोणता व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर korfad लागवड ही सर्वात उत्तम आहे त्याकरता तुम्हाला जास्त वेळ पण द्यावा लागणार नाही आणि नाही पैसे परंतु उत्पन्न मात्र तुम्हाला कित्येक पटीने मिळेल कोरफड ही प्रत्येकाच्या घरी नाही तरी बऱ्याच जणांच्या घरी लावलेली असते आणि त्याचे औषधी गुणधर्म सुद्धा खूप आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोरफड ची मागणी खूप राहणार आहे त्यामुळे आपण जर कोणता व्यवसाय करायचा विचार करत असाल तर तुमच्या करता हा व्यवसाय बेस्ट आहे

Read  Ayurvedic Medicine Chia Seeds Production | आयुर्वेदिक चिया सीड्स उत्पन्न

चला तर मग या लेखामध्ये आपण कोरफडीची लागवड कशी करायची यासाठी तुम्हाला पैसे किती लागतील आणि त्यापासून तुम्हाला लाख म्हणजेच उत्पन्न किती मिळेल हे सर्व माहिती करून घेऊ या.

कोरफड लागवड Korfad Lagwad

कोरफड लागवड करताना तुमच्याकडे थोडीशी जमीन असणे गरजेचे आहे. कोरफडीच्या पिकाला सर्वात जास्त कंपन्यांकडून मागणी असते.  कंपन्या कोरफड पासून विविध प्रॉडक्ट बनवतात आणि लाखो रुपये नफा सुद्धा कमावतात. कोरफड ची मागणी जास्त परंतु त्याचे उत्पन्न कमी आहे. म्हणून हा आपण व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे. ज्यामध्ये आपल्याला कमी पैसे लावून लाखोंचे उत्पन्न घेता येईल. कॉस्मेटिक आणि हर्बल प्रोडक्स मध्ये सर्वात जास्त कोरफड वनस्पती चा वापर होतो.

Korfad मागणी

त्यामुळेच कंपन्या कोरफड ची मागणी अधिक करत आहेत. काही कंपन्या कोरफड ची शेती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सुद्धा करतात. म्हणजेच कंपन्या आणि शेतकरी यांच्या मध्ये कोरफड पिकाची लागवड म्हणजेच शेती करण्यासाठी एक करार होतो. ज्यामुळे कोरफड चे उत्पादन वाढवणे शक्य आहे. नोकरी करणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कोरफड शेती आकर्षित करीत आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रोसेसिंग युनिट ची सुरुवात देखील झालेली आहे.

Read  Laptop Anudan Yojana 2023 | लॅपटॉप अनुदान योजना 2023.

युनिटच प्रशिक्षण मिळतं

तुमची जर प्रोसेसिंग युनिट सुरु करण्याची इच्छा असेल तर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट म्हणजेच (CIMAP) याचं ट्रेनिंग काही महिन्यांसाठी होते आणि याचे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागते. आपण फी भरल्यानंतर आपले ट्रेनिंग सुद्धा सुरू होते.

कोरफड ची शेती आपल्याला करायची असेल तर ह्या करता हवामान उबदार असणे गरजेचे आहे. उष्ण वातावरणात आणि कमी पावसामध्ये तुम्ही कोरफडीचे उत्पादन चांगलं घेऊ शकता. ही वनस्पती थंड हवेमध्ये संवेदनशील असते.

चिकन माती व वालुकामय माती मध्ये याचं उत्पन्न चांगलं मिळतं, तसेच तुम्ही काळ्या माती मध्ये सुद्धा याची लागवड करू शकता. कोरफडीची लागवड करत असताना आपल्याला हे पण ध्यानात ठेवणे आवश्यक आहे की, याची लागवड करताना जमिनीची भूजल पातळी थोडी उंचावर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतामध्ये योग्य ड्रेनेज सिस्टिम सुद्धा असणे गरजेचे आहे. आपण जुलै-ऑगस्टमध्ये याची लागवड करणं खूप चांगलं.

Read  हरभरा लागवड तंत्रज्ञान | Harbhara Lagwad

Korfad खर्च किती येतो?

ICAR म्हणजेच इंडियन कौन्सिल फॉर एग्रीकल्चर रिसर्च यांनी सांगितल्याप्रमाणे अडीच एकर म्हणजेच एक हेक्‍टर कोरफडीच्या लागवडीकरता तुम्हाला जवळपास 27 हजार 500 रुपये खर्च येईल खत, मजुरी शेतीची तयारी ह्याकरता तुम्हास पहिल्या वर्षांमध्ये जवळपास पन्नास हजार रुपये खर्च येईल. अडीच एकरामध्ये तुम्हाला जवळपास कोरफडीचे 40 ते 50 टन पानं मिळू शकतात.

Korfad पासून किती रुपयांचे उत्पन्न मिळेल?

ही कोरफड तुम्हाला आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवणारे किंवा कॉस्मेटिक उत्पादन करणाऱ्या कंपन्याना विकता येईल.

Korfad ची पानं जाड असतील तर त्यांना देशांमध्ये खूप मागणी आहे. कोरफड 1 टन जवळपास 20 हजार रुपयांनी विकले जाते, ज्याप्रमाणे तुम्ही जवळपास दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकता. कोरफड लागवड कशी करावी याबद्दलचा संपूर्ण लेख पुढे प्रकाशित करणार आहे.

Leave a Comment