Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

Krushi Karj Mitra Yojana या दोन जिल्ह्याकरता कृषी कर्ज मित्र योजना ऑनलाईन अर्ज झाले सुरू…… जाणून घ्या कोणते आहे ते जिल्हे….

कृषी कर्ज मित्र या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवून देण्यासाठी त्यास मदत करणे, मार्गदर्शन करणे यासाठी तरुणांना शासनातर्फे मानधन देण्यात येणार आहे. तर कृषी मित्र म्हणून नोंदणी कशी करावी? याविषयीचे अर्ज अर्ज सुरू झालेली आहे. हे अर्ज सांगली व औरंगाबाद या दोन जिल्ह्यांकरिता उपलब्ध झाले आहेत.

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (krushi karj mitra yojana) कृषी कर्ज मित्र योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड सहज करता यावी यासाठी बँकेच्या (bank loan) माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जाची (loan) सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. सांगली व औरंगाबाद हे दोन जिल्हे आहेत ज्या मध्ये ही योजना सुरू झाली आहे तसेच कशा प्रकारे तुम्ही कृषी मित्र म्हणून नोंदणी करू शकता. या विषयीची सविस्तर माहिती आपण या पोस्टच्या माध्यमातून पाहणार आहोत.

या योजनेकरिता नोंदणी कसे करावी :
मित्रांनो तुम्हाला कृषी मित्र म्हणून नोंदणी करण्यासाठी जि. प. सांगलीच्या अंतर्गत अर्ज सुरू झालेले आहे. त्यासाठी तुम्हाला गुगलच्या सर्च बार मध्ये जिल्हा परिषद सांगली टाईप करायचा आहे, सर्च करायचं आहे.

Read  अतिवृष्टी नुकसानभरपाईचे सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

जिल्हा परिषद सांगली अशाप्रकारे जिल्हा परिषद सांगली सर्च केल्यानंतर पहिलीच जी टॅब आपणास दिसते, त्यावर एकदा आपल्याला क्लिक करायचं आहे.

त्यावर क्लिक केल्या नंतर जिल्हा परिषद सांगली वेब पोर्टल आपणासमोर ओपन झालेला दिसेल.

त्या वेब पोर्टलच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या तीन टिंबावरती आपल्याला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर बरेच काही ऑप्शन आपल्याला दिसतील त्यापैकी “जि.प. विभाग” या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे.

जि. प. विभाग या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर बरेच ऑप्शन येतील, त्यापैकी “कृषी विभाग” या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर सांगली जिल्ह्याचे वेबपोर्टल आपल्या समोर ओपन झालेली दिसेल. या वेब पोर्टल वर गेल्यानंतर आपल्याला लाल रंगांमध्ये “कृषिकर्ज मित्र योजना नोंदणी” असे दिसेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.

त्या टॅब वर क्लिक केल्यानंतर “महाराष्ट्र कृषी कर्ज मित्र योजना नोंदणी” याठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पूर्ण नाव लिहायचे आहे. त्यानंतर आपला संपूर्ण पत्ता लिहायचा आहे.

तसेच आपल्या तालुक्याचे नाव कोणता आहे. त्यानंतर ग्रामपंचायत निवडायचे आहे.

ग्रामपंचायत निवडल्यानंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या मोबाईल वर आपल्याला एक ओटीपी येईल. तो ओटीपी फ्रॉममध्ये भरायचा आहे आणि पुढील पर्याय वरती क्लिक करायचा आहे.

Read  Pik Vima Yojana Online Form List Maharashtra 2020-21पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

त्यानंतर मित्रांनो तुमचा ईमेल आयडी, आधार क्रमांक टाकायचा आहे.

बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आधार संलग्नित असणे आवश्यक आहे. त्यानंतर शाखा आयएफसी कोड, तुमची शैक्षणिक अहर्ता काय आहे आणि इतर सर्व माहिती तुम्हाला नोंदवायची आहे त्यानंतर

त्यानंतर यापूर्वी तुम्ही सेवा क्षेत्रात तपासणी अनुभव असल्यास त्याविषयीची सुद्धा तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे.

त्यानंतर तुमच्या समोर दहा गावे निवडण्याचा ऑप्शन येईल. तुम्हाला ज्या गावांमधून साठी लोन पाहिजे असेल त्या गावासाठी तुम्ही लोन घेऊ शकता.

त्यासोबतच तुम्हाला काही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत व तुमचा एक फोटो सुद्धा अपलोड करायचा आहे.

त्याच बरोबर इतर कागदपत्रांमध्ये यामध्ये तुमचे काही अनुभव प्रमाणपत्र असे या शैक्षणिक अहर्ता असली तर या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावयाचे आहेत.

आणि मित्रांना मोबाईल क्रमांक ओटीपी व्हेरिफाय केलं तर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे. अशाप्रकारे सांगली जिल्ह्यातील कृषि कर्ज मित्रासाठी नोंदणी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

औरंगाबाद जिल्ह्यासाठी कृषी कर्ज मित्र योजना नोंदणी :
याव्यतिरिक्त दुसऱ्या जिल्हा औरंगाबाद हा आहे. ज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यासाठी आपण सर्च केले होते तसेच जि.प. औरंगाबाद सर्च करायचे आहे. आपण सांगली जिल्हा करता ज्या प्रमाणे सर्च केल आहे. त्याचप्रमाणे या जिल्ह्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचं प्रोसिजरने सर्च करू शकता.

Read  Pik Karj 2022 | शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज 1 एप्रिल पासून

फायदे :
ही योजना महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केली आहे. कृषी कर्ज मित्र योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरपूर लाभ मिळणार आहे. या योजनेद्वारे शेतकरी कर्जाच्या सुविधेसह त्यांचे कर्ज फेडू शकतात. अल्प मुदतीच्या कर्जासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज 150 रुपये सेवा शुल्क भरावे लागेल. या योजनेअंतर्गत, नवीन दीर्घकालीन कर्जासाठी 250 रुपये आणि कर्जाच्या नूतनीकरणासाठी 200 रुपये सेवा शुल्क आकारले जाईल. कृषी कर्ज मित्र योजनेतून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

या योजनेकरिता पात्रता निकष काय आहेत ते आपण जाणून घेऊया.

इच्छुक लाभार्थ्याने महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्जदारांना कर्जासारख्या बँकिंग सेवांचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.

कृषी कर्ज मित्र योजनेसाठी फक्त बेरोजगार उमेदवार अर्ज करू शकतात. बँक कर्ज घेताना अर्जदारांना कागदपत्रे, आवश्यक कागदपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे.

उमेदवाराला पैशाचे साधे व्यवहार करता आले पाहिजेत. अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि ते वाचण्यास/लिहिण्यास सक्षम असावेत.

सर्व उमेदवारांना स्मार्टफोन, टॅब्लेट इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालविण्यास सक्षम असावे.

Krushi Karj Mitra Yojana ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतर शेतकरी बांधवांना शेअर करा.

 

One thought on “Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

Leave a Reply

Your email address will not be published.

x