group

Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

Krishi yantriki karan Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना  :-

 कृषी साधनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.  जेणेकरून शेतकरी कमी श्रम करून अधिक पीक मिळवतील. आणि पिकांच्या उत्पन्नात वाढ होईल. कृषी यांत्रिकीकरण योजने करिता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया करावी लागेल.  कृषी यांत्रिकीकरण योजना नुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर 80 टक्के पर्यंत अनुदान देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे.                                                                                                                                                                                                      शेतकरी मित्रांनो कमी खर्चात जास्तीत जास्त शेती उत्पन्नासाठी यांत्रिकीकरण असणे खूप आवश्यक आहे.  कृषी यांत्रिकीकरण म्हणजे जेथे शक्य असेल तेथे यंत्राद्वारे प्राणी आणि मानवी शक्तीची पुनर स्थापना होय. कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरवल्या जातात.  ज्यामुळे शेतकरी कमी किमतीत जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो.  कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर ट्रेडर, उडणारी फॅन, औषध, फवारणी पंप, डस्टर सिंचन पंप इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरवल्या जातात. अशा प्रकारे मागील पाच वर्षे वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.  मिशन ऑन एग्रीकल्चर मेकॅनिझेशन ( एनजीटी ) योजनेद्वारे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजना नुसार ८० टक्के पर्यंत अनुदान देणार आहे.  जेणेकरून शेतकरी शेतीसाठी प्रेरित होतील. आणि शेतकरी शेतीतून अधिक उत्पन्न मिळवतील.Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

Read  Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

कृषी यांत्रिकीकरण योजनेकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

1)  आधार कार्ड.

 2)  बँकेचे पासबुक.

 3)  सातबारा आणि आठ.

 4)  जे यंत्र खरेदी केले आहे त्याचे ओरिजनल बिल.

 5)  जर ट्रॅक्टर शेतकऱ्याचे नाव असेल तरच त्यावर अनुदान मिळेल.Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

कृषी यांत्रिकीकरण योजने करिता पात्रता :-

  • शेतकरी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.
  • शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असावी.
  • अर्जदार जर अनुसूचित जाती किंवा जमातीय विभागात मोडत असेल तर त्यांना जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • ट्रॅक्टर साठी अनुदान हवे असेल तर शेतकऱ्याच्या नावावर ट्रॅक्टर असावे.Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

कृषी यांत्रिकीकरण योजने करिता ऑनलाईन अर्ज कसा भरावा :-

तुम्हाला जर कृषी यांत्रिकीकरण योजना सा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्या समोर कृषी विभागाचे मुखपृष्ठ उघडेल.

Read  Anganwadi Bharti 2023 Online Form | अंगणवाडी भरती ओनलाईन फॉर्म २०२३

मुखपृष्ठावरच तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन किंवा लिंक दोन असे पर्याय असतील तुम्हाला त्यापैकी कोणत्या एका पर्यायावर क्लिक करावे लागेल.

नंतर पुढील पृष्ठावर तुमच्यासमोर कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज उघडेल.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल जर माहिती चुकली तर तुम्ही या योजनेत पात्र ठरणार नाही.

सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

 कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये या अवजारांवर मिळणार सबसिडी :-

शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना खालील शेती उपयोगी यंत्र व अवजारे खरेदी करण्याकरिता अनुदान वितरित करण्यात येत आहे खालील यंत्र व उजारांवर महाडीबीटी कृषी यांची करणे योजनेअंतर्गत सबसिडी मिळेल.Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.
ट्रॅक्टर
पावर टिलर
ट्रॅक्टर चलित अवजारे
पावर टिलर चलित अवजारे स्वयंचलित अवजारे
फलोत्पादन यंत्र व अवजारे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र व अवजारे काढणी पश्चात तंत्रज्ञान
प्रक्रिया संच
कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत वरील यंत्र व अवजारांकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनुदान पुरविण्यात येत आहे कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत वरीलपैकी कोणत्याही घटकांतर्गत आपण लाभ मिळू शकता.Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

Read  Cash Limit At Home 2023 | घरामध्ये किती रक्कम ठेऊ शकतो २०२३ .

कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया :-

शेतकरी मित्रांनो, वरील प्रमाणे कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या अंतर्गत ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज हा छाननी अंतर्गत जातो.  म्हणजेच तुम्ही केलेल्या अर्ज चेक करण्यात येतो. त्यांची छाननी करण्यात येते. त्यानंतर जास्त अर्ज प्राप्त झाल्यास महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने शेतकरी योजना ची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात येते.  शेतकरी अनुदानाची लॉटरी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांचे नाव त्यामध्ये आलेले आहेत. त्यांना त्या घटकातील लाभ देण्यात येतो. जर कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लॉटरीमध्ये तुमची निवड झाल्यास तुम्हाला  एसएमएस प्राप्त होतो. त्यानंतर तुम्हाला पोर्टलवर लॉगिन करून योजनेसंबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावे लागतात. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी येऊन पाहणी करतात. सर्व बिल आणि कागदपत्रे बरोबर असल्यास अनुदान मागणी करावी लागते. त्यानंतर शासनाच्या वतीने तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा करण्यात येते. Krushi yantrikikaran Yojana | कृषी यांत्रिकीकरण योजना.

पुढील माहित साठी येथे क्लिक करा.

group

Leave a Comment

x