Power Tiller Subsidy Maharashtra | पावर टिलर अनुदान योजना

Power Tiller Subsidy Maharashtra – शेतकऱ्यांना पावर टिलर करता कृषी यांत्रिकिकरण याकरता राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अंतर्गत अनुदान दिले जात असते पावर टिलर करता अर्ज करत असताना अटी, शर्ती, पात्रता, याकरता लागणारे कागदपत्रे, अनुदान किती मिळणार, ऑनलाइन अर्ज या सर्वांची माहिती आज आपण या लेखामध्ये बघूया.

पावर टिलर अनुदान योजना पात्रता

  1. अर्जदार हा शेतकरी असावा.
  2. 8अ व सातबारा असावा ज्यावर कमीत कमी एक एकराची नोंद असावी.
  3. अर्जदाराच्या नावावर कमीत कमी एक एकर जमीन असावी.
  4. आधार कार्ड असावे. ते महाडीबीटी पोर्टल वरील लिंक असावे. जेणेकरून ते आपण महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करू शकतो.
  5. अर्जदाराने महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी म्हणून नोंदणी करावी.
  6. अर्जदार हा अनुसूचित जाती, जमाती चा असेल तर त्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
  7. अशा प्रकारच्या योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर दहा वर्षेपर्यंत पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  8. ज्या डीलर कडून पावर टिलर खरेदी करायचा आहे त्यांच्याकडून कोटेशन घ्यावेत. कोटेशन बरोबरच एक तपासणी अहवाल घ्यावा जास्त केस रिपोर्ट असे सुद्धा म्हणतात जो ऑनलाइन अपलोड करावा लागणार आहे.
Read  Pradhan Mantri Ujjwala Yojana मोदी सरकार कडून या महिन्यात फ्री गॅस कनेक्शन मिळणार

पावर टिलर मध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे 8 बीएचपी पेक्षा जास्त आणि दोन म्हणजे 8 बीएचपी पेक्षा कमी. 8 बीएसपी पेक्षा जास्त पावर टिलर हवे असल्यास अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्ग करता जास्तीत जास्त 85000 रूअनुदान मिळणार आहे. जे 50% च्या मर्यादित असते. समजा आपल्याला 120000 रू पावर टिलर घ्यायचे असेल तर आपल्याला पन्नास टक्के अनुदान म्हणजेच 60 हजार रुपये अनुदान दिल्या जाईल. मात्र जास्तीत जास्त अनुदान हे 85 हजार रुपये राहणार आहे.

याव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील अर्जदारास जास्तीत जास्त 65 हजार रुपये अनुदान दिले जाईल. तसेच 8 बीएसपी पेक्षा कमी जे पावर टिलर आहेत. त्यामध्ये एसीएसटी च् प्रवर्गा करता जास्तीत जास्त 70 हजार रुपये तर खुल्या प्रवर्गातील अर्जदारास जास्तीत जास्त 50 हजार रुपये अनुदान मिळेल.

Read  शेळी पालन कुक्कुट पालन अनुदान Shelipalan Kukkutpalan-2021

अर्ज करण्याकरता आपल्याला महाडीबीटी च्या फार्मर स्कीमवर जाऊन अर्ज करायचा आहे.

येथे क्लिक करून अर्ज करू शकता

 

3 thoughts on “Power Tiller Subsidy Maharashtra | पावर टिलर अनुदान योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x