भारत देश हा शेतीप्रधान देश असून त्यातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे व शेतीमध्ये असते पीक पिकाला गरज असते पाण्याची पिकांना पाणी देणे हे सर्वात मुख्य व मोठे काम असते शेतकरी बांधव पिकांना पाणी हे मोटरीच्या साह्याने देतात पण कधी कधी लाईन नसल्यामुळे ते काम राहून जाते याच कारणाने केंद्र शासनाकडून 2021 या वर्षापासून कुसुम सोलर पंप योजना या योजनेची सुरुवात झाली होती मात्र आतापर्यंत काही शहरांमध्ये या योजनेचा उद्रेक सुद्धा झाला नाही.
शेतकरी बांधवांच्या हितासाठी शासन नेहमी विविध योजना राबवत असते त्यातील एक योजना म्हणजे कुसुम सोलार पंप योजना. शेतकऱ्यांसाठी अनेक वेळी पाणी देणे शक्य होत नाही कारण कधी बीज नसते कधी लोड शेडिंग असते त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये कुठेतरी कमी भासते. हे संकट दूर व्हावे म्हणून सरकारने कुसुम सोलर पंप योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी आणली होती.