काठीने वार करून संपविले: मग म्हणाला विष पिऊन मेली महिला; दारूच्या वाद; आरोपीला अटक

परतवाडा : दारू पिण्याच्या वादातून एक महिला व पुरुषामध्ये झालेल्या वादातून शनिवारी रात्री हातपाय, डोक्यावर काठीने वार करून महिलेची हत्या करण्यात आल्याची घटना नजीकच्या गौरखेडा कुंभी शिवारातील शेतात रविवारी सकाळी उघडकीस आली. आरोपीने थेट पोलिस पाटलाचे घर गाठले आणि ती महिला विष प्राशन करून मरण पावल्याचा बनाव केला. परंतु, घटनास्थळी दाखल झालेल्या परतवाडा पोलिसांनी मृतदेहाची स्थिती लक्षात घेऊन त्याला अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला. अनिता गणाजी पानसे (४०, रा. कविठा) असे मृताचे नाव आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुन्ना भैयालाल बारस्कर (३६, रा. कोठारा, ह.मु. अजय जाधव यांचे शेत, गौरखेडा कुंभी) याला अटक करण्यात आली आहे. मुन्ना हा परतवाड्याच्या तिरुपतीनगरला लागून असलेल्या गौरखेडा कुंभी येथील अजय जाधव यांच्या शेतात रखवालदार म्हणून काम

Read  तरुणीला गरोदर करून म्हणाला 'तो मी नव्हेच'! अतिप्रसंग, गर्भपात : दुसरीशीच संधान

करीत होता. अजय जाधव यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना बारस्कर व अनिता हे दोन वर्षांपासून सोबत राहत होते. तिला दारूचे व्यसन होते. शनिवारी दोघांमध्ये दारूवरून वाद झाला. मुन्नाने महिलेच्या डोक्यावर, हात-पायावर काठीने प्रहार केला.

Leave a Comment