Laptop Anudan Yojana 2023 | लॅपटॉप अनुदान योजना 2023.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवत असते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लॅपटॉप खरेदी करणे साठी अनुदान दिले जाणार आहे. आज-काल दुनिया डिजिटल होत चालली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देखील डिजिटल पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी लॅपटॉप गरजेचा आहे. विद्यार्थ्यांना लॅपटॉप वर अनेक शैक्षणिक कामे करावी लागतात जसे प्रोजेक्ट बनवणे ऑनलाइन लेक्चर पाहणे कोणत्याही कामाकरिता आता ऑनलाईन काम करावे लागते जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने एक खास योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव आहे मोफत लॅपटॉप योजना. या योजनेच्या नावावरून कळते की एक रुपया न खर्च करता मिळेल. आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांची कुटुंबीय आर्थिक परिस्थिती बेताची आहे. लॅपटॉप घेण्यासाठी 25 ते 30 हजार रुपये लागतात यामुळे सामान्य घरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉप घ्यायला परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन योजना सुरू केली आहे. या योजनेमार्फत लॅपटॉप खरेदी करण्यासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. वैद्यकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी योजना समाज कल्याण विभागाकडून राबवली जाते. इतर शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाहीत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.