चांडक महाविद्यालयाच्या ऋतुजा लोणेची राज्य महिला क्रिकेट संघात निवड

मलकापूर दि .3-1-2024
नुकत्याच क्रिडा संकुल मलकापूर येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील राज्यस्तरिय निवड स्पर्धेत . ली. भो चांडक विद्यालयाची विद्यार्थीनी कु. ऋतुजा रामेश्वर लोणे हिची राज्य महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे.
ऋतुजा ही मलकापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज अकॅडेमीची खेडाळू असून तिने या पूर्वी जिल्हा व विभागावर अत्यंत चांगली कामगिरी दाखविली आहे. ती उत्कृष्ट बॉलर, बॅट्समन, क्षेत्ररक्षक आहे. तिला अकॅडमीचे प्रशिक्षक श्री सांळुंके सर, स्वप्नील सर तसेच नईम सर यांनी आजपर्यंत मार्गदर्शन केले आहे. ती गुजरातमध्ये होवू घातलेल्या आंतरराज्यीय स्पर्धेमध्ये ११ ते १४ जानेवारी रोजी सहभागी होणार आहे. सदरच्या नियुक्ती मुळे विद्यालयात तसेच नगरात सर्व क्रिडाप्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऋतुजावर नगरात सर्वत कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या निवडी निमित्त आयोजित कार्यक्रमात माननीय मुख्याध्यापक डॉ. जयंत राजूरकर विद्यार्थ्यांसामोर सत्कार तसेच कौतुक केले. ह्या निवडीमुळे विद्यालयातील विद्यार्थ्याना प्रेरणा मिळाली आहे. आपल्या निवडीचे श्रेय तिने शाळेचे क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक,कोच श्री सांळुंकेसर, स्वप्नील सर तसेच नईम सर यांना दिले आहे .

Leave a Comment