group

LPG Gas Subsidy Mylpg | एलपीजी गॅस सिलेंडर सबसिडी

LPG Gas Subsidy Mylpg तसे पाहिले तर एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर चे दर सतत वाढतच आहेत. प्रत्येक महिन्याला नवीन दर लागू केले जात आहे. त्यामुळे एलपीजी सिलिंडरवर मिळणारी सबसिडी हे आपल्यासाठी एक दिलासादायक गोष्ट आहे. परंतु ही सबसिडी आपल्याला बँक अकाउंट मध्ये येते किंवा नाही हे कधीकधी समजत पण नाही.

तुम्हाला तुमच्या सबसिडीची रक्कम तुमच्या बँक अकाउंट मध्ये येते किंवा नाही हे कसे पाहता येईल? तर आपण टोल फ्री नंबर वर तक्रार करू शकता याकरिता 18002333555 नंबर वर कॉल करून आपण तक्रार नोंदवू शकता किंवा अकाउंट मध्ये सबसिडी का येत नाही याची माहिती आपल्याला मिळू शकते.

LPG Subsidy Status

  • सर्वात प्रथम आपण https://mylpg.in या वेबसाईटवर जा.
  • यानंतर तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाका व रजिस्टर मोबाईल नंबर सबमिट करा.
  • यानंतर कॅपच्या को टाकून कंटिन्यू बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी टाका.
  • यानंतर पुढील पेज वर तुमचा ईमेल आयडी टाकून पासवर्ड जनरेट करा.
  • यानंतर तुम्ही दिलेल्या ई-मेल वर एक एक्टिवेशन लिंक येईल त्यावर क्लिक करून तुमचे अकाऊंट ऍक्टिव्हेट होईल.
  • अकाऊट तयार झाल्यानंतर तुम्ही mylpg.in या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करा.
  • यानंतर तुमच्या आधार कार्ड एलपीजी अकाउंट सी लिंक असेल तर त्यावर क्लिक करा.
  • यापुढे आपल्याला View Cylinder Booking History / Subsidy Transferred या पर्यायावर तुम्ही तुमच्या एलपीजी गॅस सिलेंडरवर सबसिडी ची माहिती बघू शकता.
Read  Drip Subsidy Maharashtra 2022 | ठिबक व तुषार सिंचन योजना

तुम्हाला आमचा योगा ब्लॉग वाचायला नक्की आवडेल.

group

Leave a Comment

x