पोलिस भरती मैदानी चाचणी २०२२ तारीख :- काही दिवसांपूर्वी शासनाने पोलीस भरती जाहीर केली होती. त्या भरतीच्या आता मैदानी चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये चालक पदासाठी पहिल्यांदा चाचणी घेणार असून शिपाई पदासाठी नंतर मैदानी चाचणी होईल. मैदानी चाचणीचे वेळापत्रक हे 2 जानेवारी ते 20 जानेवारी पर्यंत राहील . पहिल्याच दिवशी सहाशे उमेदवारांना बोलविल्या जाणार आहे . ही मैदानी झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षा घेण्याचे ठरविले जात आहे. ग्रामीण भागातील मैदानी चाचणी ही देखील दोन जानेवारीपासून सुरू होणार आहे. सर्व राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा घेणार आहे मुंबई शहर वगळता . ही चाचणी पारदर्शक पद्धतीने होणार आहे . मैदानावर भरतीच्या वेळी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले असतील . यावर्षी पहिल्यांदा तृतीयपंथीयांना देखील या चाचणीत सहभागी होता येणार आहे.