Maharashtra budget 2022-23 | नियमित कर्ज धारकांना 50,000 रुपये अनुदान

Maharashtra budget 2022-23 नियमित कर्ज धारकांना 50,000 रुपये अनुदान मिळणार. मित्रांनो, राज्यात सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून सन 2022-23 करिता चा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे.

आणि मित्रांनो याच अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यासाठी रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत, जे आपल्या कर्जाची परतफेड नियमित व्यायाम करतात. अश्या शेतकऱ्यांसाठी ₹ 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याविषयीची माहिती आपण पाहूया.

तस पाहिलं तर 2021-22 च्या बजेटमध्ये सुद्धा अशाच प्रकारची घोषणा करण्यात आली होती परंतु कोरोनाचा कार्यकाल आणि राज्यांची असलेली हालाखीची परिस्थिती या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती ही घोषणा केली होती, याची अंमलबजावणी करण्यात आली होती परंतु या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आता साधारणपणे राज्यातील 20 लाख शेतकरी पात्र होतील अशा प्रकारची माहिती 2022-23 करता या योजनेकरिता 10 हजार कोटी रुपयांची तरतूद सादर केलेला अर्थसंकल्प मध्ये करण्यात आली.

Read  कृषी कर्जाला चक्रवाढ व्याजमाफी नाही, केंद्र सरकार

मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत 20 लाख शेतकरी पात्र केले जातील अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. परंतु या पात्र करण्यात येणारे शेतकऱ्यांसाठी काय असतील? त्यांची पात्रता कशा प्रकारे केली जाईल? या संदर्भातील शासन निर्णय किंवा ही योजना कशा प्रकारे राबविली जाणार आहे.

यांच्या संबंधातील आधार प्रमाणीकरण असेल किंवा इतर प्रक्रिया असतील यांच्या संदर्भातील देण्यात येणारी पुढील व्यवस्थित अशी माहिती आपण आपल्या पोस्टच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करुया जेणे करून या योजनेअंतर्गत पात्र होणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपये अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल अशी आशा केली जाते.

तर मित्रांनो अशा प्रकारे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शेतकरी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या. कर्जमाफी करण्यात आली त्या दरम्यान नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येणार होते. मात्र, त्याची पूर्तता यंदा केली जाणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना यासाठी 10 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बॅकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपायांची कर्जमाफी केली जाणार आहे.

Read  Pik Karj 2022 | शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज 1 एप्रिल पासून

या वर्षीची कर्जाची परतफेड केली जाईल 2022 ची कर्ज परतफेड झाल्यानंतर या अंतर्गत शेतकरी पात्र होतील. त्या शेतकऱ्यांना देखील त्यामध्ये समावेश केला जाऊ शकतो आणि एकदा परतफेड झाल्यानंतर साधारणपणे 3 जून 2022 नंतर या योजनेची अंमलबजावणी होऊ शकते. अशा प्रकारची अपेक्षा आहे तर मित्रांनो याविषयीची अपडेट आपण लवकरच घेऊ.

तर ही Maharashtra budget 2022-23 माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment