महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 50 हजार नियमित कर्जदार अनुदान | 50 Hajar Karj mafi Anudan Yojana List

50 Hajar Karj mafi Anudan Yojana List महाराष्ट्र मध्ये सर्वात जास्त शेतकरी आहेत शेतीशी निगडित कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेत असतात सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 153 लाख शेतकरी आहेत सन 2015 16 ते 2018 19 या सलग चार वर्षांमध्ये राज्यामधील विविध अशा भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी जाहीर करण्यात आली होती ही शेतकऱ्यांची परिस्थिती बघता आता शासनाने निर्णय घेतलेला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळावा याकरता 27/07/2022 रोजी मंत्रिमंडळ बैठक झाली या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये असे ठरले की, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50000 लाभ देण्याबाबत मान्यता देण्यात आलेली आहे.

“महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेची माहिती खालील प्रमाणे”

  •  ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्याकरिता सन 2017-18  सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षामध्ये पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्याकरता मान्यता देण्यात आलेली आहे.
  • प्रशांत पर लाभ देता वेळी वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादेत प्रशांत वल्लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल.
Read  Shetkari Karjmafi Yadi | शेतकरी कर्जमाफी यादी

कर्जमुक्ती योजनेकरिता खालील निकष निश्चित करण्यात आलेले आहेत

  • या योजने करता केवळ राष्ट्रीयीकृत बँका ग्रामीण बँका खाजगी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी म्हणजेच बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीककर्ज विचारात घेण्यात येणार आहे.
  • या योजनेचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.
  • सन 2019 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेसाठी पात्र असतील तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा या प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार आहे.

जीआर पाहण्याकरता येथे क्लिक करा

Read  Pik Karj Yojana पीक कर्ज

खालील व्यक्तींना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही

  • महाराष्ट्र राज्यातील आजी-माजी मंत्री, राज्यमंत्री आजी-माजी लोकसभा राज्यसभा सदस्य, आजी-माजी विधानसभा विधानपरिषद सदस्य.
  • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी.
  • केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे (मात्र चतुर्थश्रेणी कर्मचारी वगळून).
  • शेती बाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती
  • राज्य सार्वजनिक उपक्रम म्हणजेच महावितरण एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे (मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळून.)
  • कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना सहकारी सूतगिरणी नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी (एकत्रित मासिक वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त असणारे) व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ
  • निवृत्तीवेतन धारक व्यक्ती ज्यांचे मासिक निवृत्ती वेतन रुपये 25 हजार पेक्षा जास्त आहे (यामध्ये माजी सैनिक वगळून)
Read  Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

कर्जमाफी यादी 2022 कुठे चेक करायची, पाहण्याकरता येथे क्लिक करा

Leave a Comment