Pik Karj Crop Loan | शेतकऱ्यांना मिळणार बीन व्याजी पीककर्ज

Pik Karj Crop Loan आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये सरकारने सहा मोठे निर्णय घेतले. नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय, तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिककर्ज, कांदळवन प्रवाळ संवर्धन, मुंबई येथे दिवाणी व सत्र न्यायालय मध्ये जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकिलांची नेमणूक प्राचीन आणि अति प्राचीन वृक्षांचे संरक्षण तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेला पूर्वलक्षी प्रभावाने मुदतवाढ असे निर्णय यामध्ये घेण्यात आले.

Pik Karj Crop Loan शेतकऱ्यांना मिळणार बीन व्याजी कर्ज

यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज Pik Karj Crop Loan बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा केली होती.

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिलेली आहे.

Read  कृषी कर्जाला चक्रवाढ व्याजमाफी नाही, केंद्र सरकार

आता पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.

महा विकास आघाडी सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या वर्धापन दिनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अनोखी भेट ठरली आहे. हा निर्णय शेतकरी कर्जमाफी च्या निर्णयानंतर चा सर्वात मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकारचा मानला जात आहे.

आमच्या Marathi School या ब्लॉगला भेट द्या.आज झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ला 6 निर्माण पैकी शेतकऱ्यांकरिता 3 लाखापर्यंतचे बिनव्याजी पिककर्ज  Pik Karj Crop Loan हा निर्णय सर्वात मोठा मानला जात आहे. तुम्हाला आरोग्य विषयी अधिक ची माहिती हवी असल्यास आमच्या मराठी आरोग्य या ब्लॉगला जरुर भेट द्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!