Pik Karj Yojana पीक कर्ज

Pik Karj Yojana शासनाचे नवीन जीआर आणि याबद्दल विस्तृत अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. माहिती घेत असतानाच आज 11 जून 2021 रोजी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये 1 लाखापासून 3 लाख रुपये पर्यंत जे शेतकऱ्यांचे पीक कर्ज आहे ते वेळेत परतफेड  शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार आहेत. मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे कर्ज कोणाला मिळते. याचा लाभ कोणाला मिळेल आणि कशाप्रकारे दिला जाईल हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

मराठी म्हणी

Pik Karj Yojana पीक कर्ज

11 जून 2021 च्या शासन निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची Pik Karj Yojana व्याप्ती वाढविण्याबाबत अशाप्रकारचा हा शासन निर्णय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्था मार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याजदरात वसुली शी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने दिनांक 24 जून 1988 रोजी घेतला होता.

शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करता अल्प दराने पीक कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याची ही योजना शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आहे शासनाने वेळोवेळी या योजनेमधील कर्जमर्यादा व व्याजदरातील सवलत यामध्ये सुधारणा केली असून त्याचा तपशील आपण पुढील प्रमाणे पाहू शकता.

Read  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana

आपण आमच्या aaimarathi ब्लॉगला जरुर भेट द्या

सध्या शेतकऱ्यांनी रुपये तीन लाखापर्यंत घेतलेल्या कर्जावर बँकेमार्फत 6 टक्के व्याज आकारण्यात येते व या कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास राज्य शासन व केंद्र शासन यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या अभ्यासावरील सवलतीचा तपशील पुढील प्रमाणे आहे.

केंद्र शासन 3 लाख रुपये कर्ज मर्यादित पर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट 3 टक्के व्याजदरात सवलत देते मात्र राज्य शासन 1 लाखापर्यंत कर्ज मर्यादेपर्यंत 3 टक्के व्याज सवलत व 1 लाख ते 3 लाख या कर्ज मर्यादेपर्यंत 1 टक्का व्याज दरात सवलत देते

यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड मुदतीमध्ये केल्यास एकूण व्याजदरांमध्ये 6 टक्के सवलत मिळवून अंतिम त्यांना सदर कर्ज शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होते मात्र शेतकऱ्यांना एक ते तीन लाख या कर्जमाफी यादी मध्ये दोन टक्के व्याज भरावे लागते महागाईमुळे कृषी निविष्ठांच्या दरात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना एक लाखापेक्षा जास्त कर्ज घेणे गरजेचे झालेले आहे.

भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध Corruption Essay in Marathi

त्यामुळे शेतकऱ्यांना तीन लाख मर्यादेपर्यंतच हे अल्पमुदत पीक कर्ज हे सरसकट शून्य टक्के व्याज दराने मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा विचारात घेऊन माननीय उपमुख्यमंत्री तथा माननीय मंत्री वित्त व नियोजन यांनी मार्च 2019 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत चे पीक कर्ज हे शून्य टक्के व्याज दराने देण्यात यावे अशी घोषणा केली होती या अनुषंगाने डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब विचाराधीन होती. आता यासंदर्भात मध्ये शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे.

Read  Pik Karj 2022 | शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज 1 एप्रिल पासून

शासन निर्णय:

डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेमध्ये सन 2021 22 या वर्षापासून पिक कर्ज घेऊन त्यांची परतफेड मुदतीमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे व्याजदरात सवलत देण्यात यावी

1)सध्या शेतकऱ्यांना एक लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम विहित मुदतीत परतफेड केल्यास त्यांना तीन टक्के व्याज दरात सवलत देण्यात येते ती कायम ठेवावी.

2) सध्या 1 लाख रुपये तीन लाख रुपये या कर्ज मर्यादेमध्ये शेतकऱ्यांनी अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास एक्का व्याजदरात सवलत देण्यात येते यामध्ये आता अधिक दोन टक्के व्याज दरात सवलत वाढवून देण्यात येत आहे जेणेकरून या कर्ज मर्यादेत व्याजदरात एकूण तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.

3) उपरोक्त व्याजदरात सवलत सुधारणेमुळे शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड विहित मुदतीत केल्यास सरसकट तीन टक्के व्याज सवलतीचा लाभ देण्यात यावा, जेणेकरून तीन लाख मर्यादेपर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाने तीन टक्के व्याज सवलत विचारात घेऊन सदर कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने उपलब्ध होईल.

Read  कृषी कर्जाला चक्रवाढ व्याजमाफी नाही, केंद्र सरकार

4) या योजनेच्या इतर अटी व शर्ती यापूर्वी ठरवून दिलेल्या शासन निर्णयाप्रमाणे कायम राहतील.

2.   अशाप्रकारे उपरोक्त योजनेचे अधिक स्पष्टीकरण देण्याच्या दृष्टीने तीन लाखापर्यंत अल्पमुदत पीक कर्ज घेऊन त्याची विहित मुदतीत परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याजदरात तीन टक्के सवलत देण्यात यावी.

3.   सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 209/1431, दिनांक 11 जून 2021 आणि वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक  281/2021 व्यय – 2 दिनांक 11 जून 2000 21 अन्वये प्राप्त मंजुरी नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे Pik Karj Yojana चा शासनाने 11 जून 2021 रोजी शेतकऱ्यां करता एक चांगला निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे आता एक ते तीन लाख रुपये कर्ज नियमित परतफेड करणाऱ्यां शेतकऱ्यांना 0 टक्के व्याजदराने सवलत मिळेल.

शासन निर्णय पहा : येथे click करा

2 thoughts on “Pik Karj Yojana पीक कर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!