महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana

Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana – महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजने करता निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय निघालेला आहे 16 सप्टेंबर 2022 रोजी.

सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधी पैकी रुपये 2350 कोटी इतकी रक्कम महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रम 33 अर्थसाह्य या लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

सदर तरतूद खर्च करण्याकरिता सहकार आयुक्त व निबंध सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अधिनस्त सहायक निबंध सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे, तसेच लेखाधिकारी अधीन सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र, राज्य पुणे यांना आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च वेळेत होईल. याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दक्षता घ्यावी तसेच याबाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.

Read  50 Hajar Anudan Yojana List Aadhaar Link Upadate 2022 | महात्मा फुले कर्जमुक्ती अनुदान योजना यादी

अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो 16 सप्टेंबर 2022 चा हा शासन निर्णय महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत 50 हजार रुपये प्रोत्साहन पर लाभ योजना योजनेसाठी निधी वितरित करण्याकरिता काढण्यात आलेला आहे.

आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50000 (पन्नास हजार) निधी वितरित होणार आहे. जीआर पाहण्याकरता खाली क्लिक करा.

जी आर करीता पाहण्याकरिता येथे क्लीक करा

 

Leave a Comment