Pik Karj 2022 | शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज 1 एप्रिल पासून

Pik Karj 2022 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना मिळणार 1 एप्रिलपासून 3 लाखांपर्यंत पीक कर्ज तेही बिनव्याजी…शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, शेतकऱ्यांना आता एक एप्रिलपासून तीन लाखापर्यंत पिक कर्ज विना व्याज दराने उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. तर चला मग पाहुया काय आहे ही माहिती. राज्यातील वाढलेल्या शेतकरी आत्महत्या, उत्पन्नाच्या तुलनेत वाढलेला खते-बियाणे, मशागतीचा खर्च, थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा, यातून आता नवा मार्ग शोधण्यात आला आहे.

1 एप्रिलपासून राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज मिळणार असून जिल्हास्तरीय बॅकर्स कमिटीच्या प्रस्तावास राज्यस्तरीय बॅकर्स कमिटीने मान्यता दिली असून आता राज्य बॅक नवी मर्यादा जाहीर करणार आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, शेतीमालाला दर नाही, बॅकांचे डोक्‍यावरील कर्ज, अशी शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणे आहेत. या आत्महत्येच्या दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांसाठी राज्य शासन आता बळीराजाला संकटकाळी मदत करणार आहे.

Read  Pik Vima Yojana Online Form List Maharashtra 2020-21पीक विमा तक्रार कोणाकडे करणार?

19 मार्च 1986 रोजी राज्यातील चिलगव्हाण ता. महागाव, जि. यवतमाळ येथील एका शेतकऱ्याने सहकुटुंब आत्महत्या केली होती. त्याची नोंद राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून झाली आहे. 2001 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत राज्यातील तब्बल 38 हजार 156 शेतकऱ्यांनी विविध कारणास्तव आत्महत्या केल्या आहेत. बॅकांकडून वेळेत कर्ज मिळत नाही, नैसर्गिक संकटातही बॅकांकडून कर्जवसुलीचा तगादा, यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावावा लागतो.

त्यावर उपाय म्हणून आता राज्य सरकारने बॅकांच्या पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीचा खर्च वाढला, उत्पन्नही वाढले, तरीही पीक कर्जाची मर्यादा वाढलेली नव्हती. त्यामुळे आता हा निर्णय घेण्यात आला असून 1 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

सोलापूरसह राज्यभरातील सर्वच बॅकांच्या पीक कर्जाची मर्यादा वाढणार आहे. नवीन आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल. तीन लाखांपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी हे कर्ज उपलब्ध होणार आहे. तीन लाखांवरील पीक कर्जासाठी मात्र, 10 टक्‍के व्याज द्यावे लागणार आहे.

Read  Shetkari Karjmafi Yadi | शेतकरी कर्जमाफी यादी

राज्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना लाभ हुईल. राज्यातील शेतकऱ्यांची संख्या जवळपास पावणेदोन कोटी आहे. त्यामध्ये बरेच शेतकरी उसाचे ऊसाचे पीक घेतात. राज्यात सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 33 साखर कारखाने सुरु असून राज्यभरातील 149 कारखान्यांकडून ऊसाचे गाळप केले जात आहे. काही शेतकरी डाळींब, केळी, द्राक्ष अशी पिके घेतात. त्यांनाही या नव्या निर्णयाचा लाभ होणार आहे. तीन लाखांपर्यंत बिगरव्याजी कर्ज मिळणार असल्याने बॅकांची थकबाकी देखील वाढणार नाही आणि पुढे कर्जमाफीची गरज भासणार नाही, असा विश्‍वास राज्य सरकारने व्यक्‍त केला आहे. राज्य शासनाचा हा लाभ इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवा व शेतकरी सुखी व्हावा ही आमची इच्छा आहे.

तर मित्रांनो, ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा व तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Comment