Crop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही

Crop Loan CIBIL शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकरिता पीक कर्ज घेते वेळेस शिबिरची अट घातल्या गेलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे शिबिल चांगले त्यांना पीक कर्ज मिळत होते आणि ज्या शेतकऱ्यांचे शिबिल चांगले नाही किंवा स्कोर कमी आहे अशांना पीक कर्ज मिळत नव्हते.

परंतु आता ही अट हटवण्याकरता एस एल बी सी ची (SLBC) बैठक तात्काळ बोलवावी अशा प्रकारचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले आहेत.

देवेंद्रजी फडणवीस यांच्या ट्विटमध्ये असे म्हटले गेले आहे की सोयाबीन उत्पादन खर्च, निर्यात धोरण तसेच आयात शुल्क वाढ यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती, सोयाबीनचा वायदे बाजारात समावेश, जीएसटीचे प्रश्न, कृषी कर्जाला सिबिल, पिक विमा, वीज इत्यादी बाबतीत विविध प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत.

Read  पुढील आठवड्यापासून 5000 कोटींच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार

शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी वरील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मुंबईमध्ये आंदोलन केले होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रविकांजीची भेट घेऊन त्यांच्या मागण्या काय आहेत हे समजून घेतले.

आणि त्यामुळेच आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी याबाबत निर्णय घेत असताना त्यांनी म्हटले आहे की, एसएलबीसी ची तात्काळ बैठक सिबिल बाबत घेण्यात यावी. शेतकऱ्यांना सिबिलची वाट लावली तर काही शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही त्यातच पीक कर्जाची रक्कम मिळत असताना तारण म्हणून सातबारावर बोजाजा चळवला जातो आणि त्यानंतर पीक कर्ज मिळत असते आणि आता ह्यातही सिबिल स्कोर तपासून जर पीक कर्ज मिळाले तर ते शेतकऱ्यांसाठी खूप हानिकारक आहे.

कधी कधी शेतकरी नापीके अतिवृष्टी नुकसान यामुळे घेतलेले पीक कर्ज भरू शकत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा सिबिल स्कोर तपासून चरपीक कर्ज मिळत असले तर शेतकऱ्यांना खूपच मनस्ताप होईल त्यामुळेच आता राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश  दिलेला आहे की लवकरात लवकर याबाबत बैठक बोलवावी.

Read  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना | Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana

संपूर्ण माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment