Farmer Information in Marathi तुम्हाला सांगतो या जगात शेतकऱ्यासारखा मोठा जुगारी दुसरा कोणीही नसेल. दचकलात ना? वेगळ्या शब्दात सांगतो..या जगात शेतकऱ्यासारखा ‘आत्मघातकी धोका पत्करणारा’ (पर्यायच नसल्यामुळे) दुसरा कोणीच मायका लाल नसेल. आता सांगतो..विचार करा, उदा. शेतकरी एक सहा ते आठ महीन्याचं कोणतही पिक घेतो.(ज्वारी, बाजरी, मका, कपाशी, सोयाबीन, गहू, धान, तूर, उडीद मूग..इतर)
या कालावधीत तो अफाट कष्ट करतो. त्याला हेही माहीत असतं की..आपले ‘श्रम,गुंतवणूक,वेळ’ हे सर्व आठ महीन्यांच्या नंतर अक्षरशः “मातीमोल” होऊ शकतं. कारणे..1)निसर्ग 2)शासन व्यवस्था..कसं ते सांगतो, एवढं करूनही निसर्ग अचानक बदलला..(अवकाळी, वादळ, वारे) तर ते पीक अक्षरशः धुळीला मिळतं आणि ऊसासारखं 14 महीन्यांचं पीकतर जिवापाड जपून अगदी 90टक्के पीक झाल्यानंतर जर का पाणी या महत्वाच्याक्षणी कमी पडले तर..त्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडल्याशिवाय रहात नाही… Farmer Information in Marathi.
आता दुसरा आणि महत्वाचा मुद्दा..बरं एवढ्या संकटातूनही वाचवून ‘सोन्यावाणी’ पीक हाती आलच तरी स्वतः (काबाडकष्ट करून) ऊत्पादीत केलेल्या मालाची किंमत तरी तो ठरवू शकतो का? तर नाही..मला सांगा, जगात असं कोणतं ऊत्पादन आहे, ज्याची किंमत ऊत्पादक ठरवत नाही. ही विक्रीची विचित्र ‘शासन व्यवस्था’ शेतकऱ्याला कर्जबाजारी करून धुळीस मिळवते.
उदा. शेतकरी जनावरे संभाळण्याची कसरत करून दिवसातले सोळा तास राबून(गाडीभर चारा एका गायीला खाऊ घातल्यावर ती15लीटर दुध देते) दुध डेअरीला घालतो..दर मिळतो रू18/-(अठरा फक्त) तेच दुध पिशवीत घालून शहरात रू 60/-ला विकलं जातं..आता मला सांगा, मधला रू 42/- चं लोणी कोण खातं???… आणि तुम्हीच सांगा शेतकरी श्रीमंत कसा होईल?. अहो श्रीमंत जाऊद्या..त्याला रोजचा प्रपंच चालविण्याईतकेही हाती लागत नाही. आता बोला… जादाबचत, इतरांसारखी हौसमौज, पिकनीक त्याच्या स्वप्नातही येत नाही. आणि स्वप्नात येऊन तरी काय ऊपयोग आहे, या जन्मातही त्याला हे शक्य नाही.
Farmer Information in Marathi अहो या गोष्टी टाळता तरी येतील..पण मुलींची लग्न, शिक्षण, अनपेक्षीत खर्च हे तो कसकाय करत असेल….इतर समाज दिवाळी सारखे सण धुमधडाक्यात साजरे करत असताना..शेतकऱ्याला ‘दिवाळी’म्हणजे मोठं संकट वाटतं..आता बोला. जरा अंतर्मुख होऊन विचार करा.