Karj Kase Fedave? Karj Mukt Kase Vhave? | कर्ज कसे फेडावे?

Karj Kase Fedave? Karj Mukt Kase Vhave? मित्रांनो आपल्याला जर कर्ज पाहिजे असेल तर आज कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे कोणीही बँकेमध्ये आपण गेलो तर आपल्याला सहज कर्ज मिळू शकते, आपण हे कर्ज तारण ठेवून किंवा नोकरीवर असाल किंवा उद्योगधंदा असेल तर मिळ शकता. कर्जत काढणे सोपे आहे परंतु ते पेडणे फारच मुश्कील किंवा त्रासदायक! कर्ज काढल्यानंतर त्याचा EMI किंवा हप्ता फेडायला खूप जड जाते. म्हणूनच या लेखांमध्ये आपण कर्ज कसे फेडायचे? यावर थोडे बोलूयात!

कर्ज म्हणजे राक्षस आणि तो जर मानगुटीवर असला तर आपल्याला झोप लागत नाही. काहीजण कर्जापायी आत्महत्या करतात, काही जण जीवनभर कर्ज फेडत राहतात, परंतु कर्जाचा काही उतारा होत नाही. त्यामुळे न खचता आपण काही सोप्या पद्धतीने कर्ज फारच कमी करू शकतो किंवा ते फेडूही शकतो. त्याकरता काही खालील काही सोप्या पद्धती करून बघा.

कर्ज कसे खेळायचे? Karj Kase Fedave?

कर्जफेड करायची असेल तर सोप्या 10 पद्धती वापरुन बघा. त्या वापरून तुम्ही काही ना काही प्रमाणात तरी किंवा सर्व कर्ज फेडू करू शकता.

Read  Kadaba Kutti Yantra Anudan Yojana | कडबा कुट्टी यंत्र अनुदान 100% योजना. |

1. आवश्यक तेच विकत घ्या.

हे कर्ज फेडण्याची सोपी पद्धत आहे जर आपल्याला एखाद्या वस्तूची काहीही गरज नसेल तर ती वस्तू मुळीच विकत घेऊ नका कोणी कितीही आग्रह केला तरीसुद्धा त्यांना सांगा की, ही वस्तू आपण नंतर घेऊ म्हणजेच तुमचे ते पैसे वाचतील आणि ते पैसे तुम्ही कर्ज फेडण्यात मध्ये वापरू शकता.

आपल्याला जवळ पैसे असले की, करमत नाही म्हणजे त्या पैशाला आपण स्वतःहून पाय फोडतो, नक्की काय तर आपण पैशाला काम लावून देतो. पैसा म्हणजे उद्याचा मित्र म्हणून त्याला विचार करून वापरा. अनाठाई खर्च थांबवा जी वस्तू कामी येणार नाही ती वस्तू विकत घेऊ नका. म्हणजेच आजपर्यंत ज्या अनावश्यक वस्तू तुम्ही विकत घेतले असतील त्यावर जो खर्च व्हायचा तो थांबेल आणि तोच थांबलेला तुमच्या जवळचा पैसा तुमच्या EMIच्या किंवा कर्ज फेडायच्या कामी येईल.

जास्त व्याजाचे कर्ज अगोदर फेडा

कर्जापासून मुक्तता व्हावी अशी अनेकांची इच्छा असते कर्ज म्हणजे वाईटच! असे म्हटले जाते परंतु कर्ज काढून नही जो पैशाचे नियमन करतो त्याला कर्ज फेडायला जड जात नाही. त्यामुळे तुम्ही एक चिंतन करा की तुम्ही कर्ज फेडण्यासाठी कोणते प्रयत्न केले उत्तर मिळेल आपण कुठलेही नियोजन केले नाही तर प्रथम आपल्या कर्जाचा आढावा घ्या जर तुम्ही प्रचंड कर्जाखाली दबलेली असाल तर त्या कर्जाची विभागणी करा. जसं की क्रेडिट कार्डचे व्याज सर्वात जास्त असते. ते सुमारे 40 टक्‍क्‍यांपर्यंत असते, त्यानंतर वैयक्तिक कर्ज ज्यास आपण Personal Loan म्हणतो त्याचा नंबर लागतो ते सुद्धा 15 ते 20 टक्‍क्‍यांपर्यंत असते. त्यानंतर गाडी विकत घेतली असेल तर त्याचे दहा ते पंधरा टक्के व्याज नंतर गृहकर्ज Home Loan अशा प्रकारे वेगवेगळे कर्ज आपण घेतली असतील. तर जे जास्त व्याजदराचे कर्ज असेल जसे की क्रेडिट कार्ड Credit Card, हे लवकर पेढा करण्याचा व्याजदर सर्वात जास्त असतो, त्यानंतर पर्सनल लोन हळूहळू कमी करा, त्यानंतर गृह कर्ज अशाप्रकारे जास्त व्याजदर असणारा लोन सर्वात अगोदर निल करा. तसेच महागड्या कर्जाची जागा स्वस्त कर्ज आणि भरून काढा स्वस्तातले कर्ज मिळवण्यासाठी तुमचा मालमत्तेचा आढावा घ्या त्या गोष्टी गहाण ठेवून काही कर्ज मिळू शकते का ते बघा.

Read  Tushar Thibak Sinchan Yojana Drip Irrigation Subsidy | तुषार ठिबक सिंचन योजना 2022

कमी व्याजाची गुंतवणूक लवकर काढून घ्या

ज्यावेळी आपण काही पैशांची गुंतवणूक करतो त्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या जर जास्त व्याजाचे कर्ज डोक्यावर असले तर आपण कमी व्याजदराने गुंतवणूक कुठेच करू नका म्हणजेच कमी व्याजाची गुंतवणूक काढून घ्या आणि क्रेडिट कार्ड, होम लोन किंवा कार लोन ह्याकरता तुम्हाला ते पैसे कमी पडतील. कारण त्या योजनेमध्ये तुम्ही पैसे गुंतवून फार कमी व्याज तुम्हाला मिळत आहे.  म्हणून ती गुंतवणूक काढून घ्या आणि जास्त किंवा महाग कर्जामध्ये टाका. जसे की, बचत पत्र, RD यामध्ये गुंतवलेले पैसे काढून घ्या याला व्याज फारच कमी मिळत असते.

खर्चाच्या बाबतीत काटकसरीने जगा

शपथ घ्या की जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत अनाठाई किंवा अनावश्यक कर्ज करणार नाही त्यामुळे कर्जमुक्त होई पर्यंत तुमच्या खर्चाला कात्री लागु शकेल. माणसाने थोडी कळ सोसली पाहिजे हात आखडता घेतला पाहिजे तरच आपण आपल्या डोक्यावरील कर्ज फेडू शकणार आहोत. मात्र मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत किंवा आरोग्याच्या बाबतीत कुठलीही काटकसर करू नका.

Read  Farmers Unique ID | शेतकऱ्यांना मिळेल युनिक आयडी

घरातील वापरात नसलेल्या वस्तू विकून टाका

बाबो हे काय सांगता! आम्हाला घरातील वस्तू विकायला सांगता? नाही मित्रांनो, ज्या वस्तू आपल्याला कधीच कामी पडत नाहीत, ज्या वस्तू आपण फार वर्षांपूर्वी घेतलेल्या आहेत आणि आता त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, अशा वस्तू जर आपण विकल्या तर आपले दोन-तीन हप्त्याचे पैसे सहज भरू शकाल. त्या वस्तू आपण पुन्हा परत मिळू शकतो परंतु जर व्याज वाढले तर ते वाढतच जाईल म्हणून वस्तू कमी करा व्याज कमी करा.

व्याजदर कमी करायला सांगा

बँकेमध्ये चा आणि आपल्या कर्जाचा Flaoting Rate किंवा Fix rate पाहून घ्या जो रेट तुम्हाला कमी वाटत असेल तो ठेवायला सांगा.

 

Leave a Comment