group

महा डी बी टी पोर्टल वर बदल शेतकऱ्यांना मिळेल लवकर अनुदान MahDBT Portal

MahDBT Portal-मित्रांनो एक शेतकरी एक अनुदान वितरणामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. एक शेतकरी एक अर्ज अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी म्हणजेच एकाच MahaDBT पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा करुन देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत जवळपास 13 योजनांसाठी शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकतात मित्रांनो आता याच योजनांच्या अनुदान पद्धतीच्या वितरणामध्ये महत्त्वाचे बदल हे शासन स्तरावरून करण्यात आलेले आहेत.

 

महा डी बी टी पोर्टल वर बदल शेतकऱ्यांना मिळेल लवकर अनुदान MahDBT Portal

 

काय बदल केलेले आहेत आणि कशा स्वरूपाचे बदल केलेले आहेत. शेतकऱ्यांना अनुदान कशा स्वरूपाचे मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहुयात.

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी मध्यवर्ती पूल खाते उघडणे बाबत अशाप्रकारे शासन स्तरावरून महाराष्ट्र शासनाने एक जीआर काढलेला आहे जीआर 21 मे 2021 रोजी काढलेला आहे कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय निघालेला आहे.

Read  Atal Pension Yojana I अटल पेन्शन योजना

 

शासन निर्णय

 

1.   कृषी विभागांतर्गत महाडीबीटी पोर्टल द्वारे राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी तसेच भविष्यात या योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावयाची असेल त्या योजनां अंतर्गत निवडलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूल खाते Central  Pool Account उघडण्यात शासन मान्यता देण्यात येत असून सदर खात्याचा वापर केवळ याच प्रयोजनासाठी करावा.

2.  संदर्भात शासन निर्णय दिनांक 13 मार्च 2020 व दिनांक 3 मार्च 2021 अन्वये राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकांमध्ये खाती उघडणे बाबत शासनाने सूचना निर्गमित केल्या असून कृषी आयुक्तालय स्तरावर मध्यवर्ती पूल खाते उघडताना सदर सूचनांचा अवलंब करावा.

3.  महा डीबीटी प्रणालीसाठी कृषी आयुक्तालय स्तरावर उघडण्यात येणारे  मध्यवर्ती पूल खाते PFMS प्रणालीशी संलग्नित करावे.

Read  Rajya Sarkar Mahangai Bhatta 2023| राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता २०२३.

4.  महाडीबीटी प्रणालीद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा विधी केंद्रीय पद्धतीने लाभार्थ्यांना वितरित करण्याकरता कोषागार आतून प्रत्येक योजनेसाठी प्राप्त होणारा निधी प्रथमता संबंधित योजनेच्या पीएफएमएस प्रणालीशी संलग्नित बँक खात्यात जमा करावा आणि नंतर तो  निधी मध्यवर्ती पूल खात्यावर म्हणजे सेंट्रल पूल अकाउंट यावर जमा करावा आणि तदनंतर कृषी आयुक्तालय स्तरावरून विविध योजना अंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना केंद्रीय पद्धतीने वितरित करावा.

5.  संदर्भात शासन निर्णय दिनांक 12 ऑक्टोबर 2018 व दिनांक 4 नोव्हेंबर 2020 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार सहाय्यक संचालक लेखा एक कृषी आयुक्तालय यांना मध्यवर्ती पूल खात्यावरून विविध योजना अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यावर वितरित करावे.

तर शेतकरी मित्रांनो अशाप्रकारे महाडीबीटी पोर्टल MahDBT Portal वरून या योजनांचा निधी मिळण्यास उशीर होत होता आता तो उशीर होणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांना लाभ  वेळेवर मिळेल. आणि आता शेतकऱ्यांना सर्व योजनांच्या अनुदानाचा लाभ वेळेवर मिळणार आहे.

Read  MSRTC Free Bus Service In Maharashtra 2023 | मोफत बस सेवा महाराष्ट्र २०२३ .

हे पण वाचा : मराठी मोल 

group

Leave a Comment

x