येत्या 24 तासात महाराष्ट्रातील या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता | IMD | Weather of Maharashtra

महाराष्ट्रातील सर्व लोक पाऊस कधी सुरू होणार याकडे लक्ष देऊन आहेत.

कोठे होणार मुसळधार पाऊस?

Weather of maharashtra-कमी दाबाचा पट्टा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात  निर्माण झाला असून त्याचं चक्रीवादळात रूपांतर कधीही होऊ शकतं. पुढील 24 तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचं वादळामध्ये रुपांतर होणार आहे. 15 ते 17 तारखेला रत्नागिरी,सिंधुदूर्ग,कोकण किनारपट्टी, आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ये यांनी दिली आहे.

तसेच 16 आणि 17  या तारखेला मुंबई, रायगड,पालघर, ठाणे, जिल्ह्यांमध्ये या वादळाचा प्रभाव दिसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. 15 ते 17 मे किनारपट्टी भागातील लोकांना सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Read  विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

आयएमडीने IMD रविवारी आणि सोमवारी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड येथे सोमवारी मुसळधार पाऊस पडेल. हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी आणि सोमवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. या काळात येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

दरम्यान, चक्रीवादळ तोक्ते मध्ये १२ तासात बदल होतील. त्यानंतर यामध्ये तिव्रता पाहायला मिळेल. सुरुवातीला हे चक्रीवादळ पुढे जाण्याची बरीच शक्यता आहे. आज संध्याकाळपर्यंत उत्तर-उत्तर-पूर्वेकडे जाईल, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

Leave a Comment