मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणाऱ्याला महिलांनी दिला चोप,गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड..

शेगाव : प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिला व मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणे एका प्रौढ व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. त्याला युवती व महिलांनी चांगलाच चोप दिला. तसेच त्याला चपलेचा हार टाकला. या घटनेचे व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याला चांगलाच धडा शिकविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा विकृत व्यक्ती शेगाव येथील आहे. त्याचे तिथे प्रशिक्षण केंद्र आहे. तिथे येणाऱ्या महिला व मुलींशी हा व्यक्ती अश्लील वर्तन करून छेडछाड करत होता. मात्र, भीतीपोटी महिला व मुली समोर येत नव्हत्या. एका धाडसी युवतीने मात्र काही महिलांसह त्याला भररस्त्यात चोप दिला. तसेच चपलेचा हार टाकून त्याला पोलीस ठाण्यापर्यंत नेले. मात्र, त्या व्यक्तीची पत्नी आणि कुटुंबियांनी विनंती केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला समज देत, पुन्हा अशी चुकी करणार नाही, असे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. यामुळे गुन्हा दाखल झाला नसला तरी महिलांनी त्याला चांगलीच शिक्षा केली आहे.

Leave a Comment