नांदुरा,:- खुमगाव – नांदुरा मध्ये रेल्वे ट्रॅकवर दहिगाव येथील एका इसमाने रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी नांदुरा-खुमगाव की, की.मी.न.५१७/१२-१४ च्या मध्ये रेल्वे ट्रॅकवर एका इसमाने रेल्वे मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली असा मेमो ऑन ड्युटी स्टेशन मास्टर नांदुरा यांनी पोलीस स्टेशन नांदुरा येथे दिल्यावरून नांदुरा स्टेशनचे पोलीस, ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून कार्यवाही केली. यावेळी मृतक इसम हा दहीगाव येथील कैलास ज्ञानदेव भोंडे (वय ३८ वर्ष) रा. दहिगाव ता.नांदुरा येथील असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी पोलिसांनी मर्ग न.९/२४ कलम १७४ नुसार गुन्हा दाखल केला.
सदर कार्यवाहीत पोलिसांना ओमसाई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, अजय गवई, कमलेश बोके, अमोल भुंबरे, कृष्णा वसोकार, वैभव रासने, राहुल इंगळे आदींनी मदत केली. तर घटनास्थळी नांदुरा पोलीस स्टेशनचे गजानन इंगळे, शाम अघाव, देवांनद शेजोळ आदी कर्मचारी हजर होते. पुढील तपास पोलीस स्टेशन नांदुराचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत मोरे करीत आहे.