मलकापूर नंतर नांदुरा तालुक्यात गांजाची लागवड करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई ; दहा झाडांसह ३ किलो गांजा जप्त,

नांदुरा : प्रतिबंधित गांजाची शेतात लागवड करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी रविवारी सकाळी तालुक्यातील टाकळी वतपाळ येथे छापा टाकत शेतातील गांजाची दहा झाडे तसेच आरोपीच्या घरातून ३ किलो गांजा जप्त करून आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी टाकळी वतपाळ येथे छापा टाकला, त्यावेळी गावातील वसंत बिसन पाखरे (६०) याने त्याच्या शेतात प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजाची झाडे लावल्याचे दिसून आले. यावेळी शेतातील १० गांजाची झाडे तसेच राहत्या घरातही ३ किलो गांजा किंमत

३० हजार रूपये आढळून आला. आरोपी त्याची विक्री करीत असल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध एनडीपीएस अॅक्टचे कलम ८.२० अन्वये गुन्हा नोंदवला. तसेच त्याला अटक केली आहे.
ही कार्यवाही पोलिस निरीक्षक विलास पाटील, पो. हवालदार मिलिंद जवंजाळ, मपोहवा कल्पना गिरी, पोकॉ सुरडकर, सुनील सुशीर, राहुल ससाने, विनायक मानकर, पंकज डाबेराव, मपोकाँ दीपा सुरडकर यांनी केली. गांजा या प्रतिबंधित पदार्थाची खरेदी विक्री करू नये. तसेच झाडांची लागवड करू नये, हा कायदेशीर गुन्हा आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment