वारंवार परीक्षा देऊनही नोकरी न मिळाल्यामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

मेरा. बु :- नोकरी न मिळाल्यामुळे तणावात असलेल्या ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अंत्री कोळी येथे ४ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली.
सविस्तर असे की चिखली तालुक्यातील अंत्री कोळी येथील रहिवाशी असलेले अमोल बाबुराव हिवाळे वय ३० वर्ष याने रेल्वे मध्ये, स्टेशन मास्तरच्या पदा करिता पेपर दिले होते. त्या परीक्षेचा निकाल लागला असता त्यांमध्ये नाव आले नाही या अगोदरही नोकरीसाठी वारंवार प्रयत्न करूनही यश आले नाही आणि आई वडीलांनी शेत मजुरी करून शिक्षणासाठी लावलेला पैसा व्यर्थ जात आहे या नैराश्यात गेलेल्या अत्यंत हुशार व कष्टाळू तरूणाने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलुन राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना तालुक्यातील अंत्री कोळी गावात घडली. अशी माहिती महेंद्र हिवाळे यांनी दिली आणि मयतचे काका दगडूबा सुखदेव हिवाळे यांच्या लेखी जबाब वरुण ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार यांनी घटनास्थळी जावून पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला. या घटनेने गावात प्रचंड हळहळ व्यक्त केली
जात आहे.

Leave a Comment