गोडाऊन मधून सोयाबीन चोरून नेत असताना एकास रंगेहात पकडले, पोस्टेला गुन्हा दाखल

साखरखेर्डा : शिंदी येथील शेतातील गोडाउनमधून सोयाबीन चोरून नेत असताना एका चोरट्यास ५ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदी येथील गोपाल तेजराव खरात यांच्या गोडाउनमधून ५ जानेवारी रोजी सायंकाळी कोणी तरी सोयाबीनचे कट्टे चोरून नेत असल्याचे जीवन खरात यांच्या लक्षात आले. त्यांनी शेतमालक गोपाल खरात यांना मोबाइल फोन वरून माहिती दिली. गोपाल हे घटनास्थळी आले असता गोडाउनचे कुलूप तोडून तीन कट्टे

चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले.तर चौथा कट्टा नेत असताना जीवन खरात याने पाहिल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पसार झाला.
शिंदी गावात पसरताच राजेंद्र खरात यांनाही कळाले तेव्हा त्यांनी माहिती दिली की प्रदीप शेषराव इंगळे हा गोडाउनमधून सोयाबीन कट्टा काढताना पाहिल्याचे सांगितले.
गोपाल खरात यांच्या तक्रारीवरून पोहे कॉ. नितीन राजे जाधव यांनी आरोपी प्रदीप इंगळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Comment