group

Mukhyamatri Kisan Yojana 2023 Maharashtra | मुख्यमंत्री किसान योजना 2023 महाराष्ट्र

Mukhyamatri Kisan Yojana 2023 Maharashtra – शेतकरी मित्रांनो सध्या केंद्र सरकारकडून पी एम किसान योजना (PM Kisan Yojana) लागू आहे. वर्षात शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात. तीन इन्स्टॉलमेंट मध्ये प्रत्येक इन्स्टॉलमेंट 2 हजार रुपयाची आहे.

महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा त्याच धर्तीवर मुख्यमंत्री किसान योजना जाहीर केली आहे. पंधरा दिवसा अगोदर वित्त विभागासोबत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या योजनेबाबत चर्चा झाली.  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यात सुद्धा केंद्राच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ (Mukhyamantri किसान Yojana) लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्रात जशी पी एम किसान योजना आहे त्याचे 6000 रुपये वर्षाला मिळत आहेत तशीच योजना राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू केल्यास वर्षाकाठी 6000 रुपये तीन समान हप्त्यात एका वर्षात मिळतील म्हणजेच आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि राज्य सरकारकडून मुख्यमंत्री किसान योजनेचे सहा हजार रुपये असे एकूण शेतकऱ्यांना 12000 रुपये एका वर्षात मिळतील.

Read  Aadhar Card Loan Yojana 2022 |आधार कार्ड लोन योजना २०२२ .

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.

राज्यात मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त व छोट्या शेतकऱ्यांचा विचार करून ही योजना लागू करत असल्याचे सांगितले आहे यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये मोठी मदतच मिळणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने मुख्यमंत्री किसान योजना खूप महत्त्वपूर्ण आहे.

येणाऱ्या आर्थिक वर्षाच्या नियोजनामध्ये मुख्यमंत्री किसान योजनेचा निधी उपलब्ध होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणेच या योजनेचा सुद्धा लाभ मिळेल.

ताज्या बातम्या करिता आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

मुख्यमंत्री किसान योजना पात्रता जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Originally posted 2022-09-11 13:19:46.

group

Leave a Comment

x