Nagapur Agriculture Department Recruitment नागपूरच्या कृषी कार्यालया अंतर्गत कृषी विभागामध्ये नवीन जागांसाठी भरती चालू असल्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
नागपूर कृषी विभागांतर्गत कृषी पर्यवेक्षक या पदाकरता ह्या जागा भरल्या जाणार आहेत गट क या संवर्गातील कर्मचाऱ्यांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्तेच्या आधारे निवड केल्या जाईल ह्याकरता अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण पदसंख्या –113
पदाचे नाव – कृषी पर्यवेक्षक गट क
या पदाकरता शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे.
- या पदाकरिता कृषी सहाय्यक गट क या पदावर 1 जानेवारी 2023 रोजी कमीत कमी 5 वर्षाहून नियमित सेवा केलेली व्यक्ती पात्र समजण्यात येईल.
- नामनिर्देशन आणि नियुक्त झालेल्या व्यक्तींस करिता कृषी सेवक पदाचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण केल्यापासून समजण्यात येईल
- पदोन्नतीच्या बाबतीत पदोन्नतीने नियुक्त झालेल्या व्यक्तींकरिता नियमित पदोन्नतीच्या पदावर हजर झालेल्या दिनांकापासून
- कृषी सहाय्यक पदावर सेवा प्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण असणारी व्यक्ती
- शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालयाने वेळोवेळी विहित केलेले संगणक परीक्षा उत्तीर्ण असणारी व्यक्ती.
- तर ते दिसायचे व्यक्ती हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण असतील किंवा त्यांनी यापूर्वीच सदर परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल किंवा ती परीक्षा देण्यापासून त्यांना सूट मिळालेली असेल अशी व्यक्ती पात्र असतील.
परीक्षा शुल्क या परीक्षेकरिता 650 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल
अर्ज ऑनलाईन पद्धतीने असणार आहे
अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28.1.2023 राहील.
स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.