राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवार पासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यासह शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.८ तर किमान तापमान पुणे येथे १७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

 

मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. त्यानंतर राज्यातील तापमान हळूहळू वाढत जाऊन उन्हाचे चटके बसायला सुरुवात केली होती.

Read  विज पडण्यापासून स्वतःला वाचण्याच्या काही सोप्या पद्धती

मराठवाडा ते दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बहुतेक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. मराठवाड्यावर चक्रिय चक्रवात आता विरून गेला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. शनिवारी कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचितशी वाढ पाहायला मिळाली, तर मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ पाहायला मिळाली.

राज्यात येत्या ४ ते ५ दिवसात काही भागांमध्ये विजांच्या गडगडासह पावसाची शक्यता असून २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रातील काही भागात तर २७ ते २८ एप्रिलदरम्यान कोकणासह गोव्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. दक्षिण तमिळनाडू आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रादरम्यान कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकडील बहुतांशी राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर आणि पूर्वेकडील काही राज्यातही पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Leave a Comment