Drone Farming in India कृषी सेवेमध्ये आता होणार ड्रोनचे आगमन….!केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापरण्यास दिले प्रोत्साहन….
कृषीसेवेमध्ये आता ड्रोनचे आगमन झाल्याने केंद्र सरकारने शेतीमध्ये ड्रोन वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूदही केली. शेतीमध्ये भूमिअभिलेखाच्या नोंदी, खते, कीडनाशक फवारणीसाठी ड्रोनच्या वापराला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. देशातील शेतांमध्ये कृषी कामांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शेतात कृषी कामांसाठी 100 किसान ड्रोनचे उद्घाटन करण्यात आले असून या ड्रोनचा वापर शेतात कीटकनाशक फवारणीसाठी केला जाणार आहे.
एका विशेष मोहिमेअंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींच्या हस्ते याचे लाँचिंग करण्यात आले. नवीन तंत्रज्ञान शेतकरी आणि तरुणांसाठी अनेक संधी घेऊन येणार आहे, असा विश्वास मोदी यांनी कार्यक्रमानंतर ट्वीट करत व्यक्त केला आहे. 21 व्या शतकातील आधुनिक कृषी सुविधांच्या दिशेने हा नवा प्रयोग आहे. मला खात्री आहे की, हे प्रक्षेपण ड्रोन क्षेत्राच्या विकासासाठी केवळ मैलाचा दगड ठरणार नाही, तर या क्षेत्रातील अमर्याद शक्यतांच्या संधीही उघडतील असे मत मोदींनी व्यक्त केले आहे. खासगी गुंतवणुकीवर भर कृषी क्षेत्रातील खासगी गुंतवणुकीवर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर मोदी सरकार भर देत आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या 2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पातदेखील कृषी क्षेत्रात ड्रोन किंवा मानवरहित हवाई सेवांसाठी अनेक प्रकारच्या सूट देण्यात आल्या आहेत. शेतीशी संबंधित कामांमध्ये ड्रोनचा वापर परिवर्तनकारक सिद्ध होईल, असे मत कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
चेन्नईस्थित स्टार्टअप कंपनीकडून निर्मितीकृषी ड्रोन विशेषत: इंटरनेट-आधारित स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे संचलित केले जाते. फवारणीपासून पीकांच्या निरीक्षणापर्यंत, तसेच अचूक कृषीसंबंधी कामे याद्वारे सहज करता येऊ शकतात. या नव्या तंत्रज्ञानाची किंमत 5-10 लाखादरम्यान असू शकते. हे ड्रोन तंत्रज्ञान चेन्नईस्थित गरुडा एरोस्पेस या देशांतर्गत स्टार्टअप कंपनीकडून बनवण्यात आले आहे. पुढील 2 वर्षात 1,00,000 ड्रोन बनवणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे तरुणांसाठी नवीन रोजगार आणि नवीन संधी निर्माण होणार आहे.
जाणून घेऊया शेतीत ड्रोन वापराचे फायदे :
हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे नुकसान कमी करता येते .
पिकांवर फवारणी करता येईल
जिओ फेन्सिंग
पिकांचे निरीक्षण
पीक वाढीचे निरिक्षण
लागवड
जमिनीचे परीक्षण
पशुधन व्यवस्थापन
पीक आरोग्य तपासणी
रसायनांचा अतिरिक्त वापर टाळणे.
तुम्ही सुद्धा आपल्या शेतामध्ये रासायनिक खते, फवारणी ड्रोनच्या माध्यमातून करू शकता. Drone Farming in India ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.