महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात पाऊसाची शक्यता | Mansoon Weather in Maharashtra

Mansoon Weather in Maharashtra गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक खराब होत आहे विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये कोसळत असलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत त्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे.

मुंबई, मुंबई उपनगर, पालघर तसेच पुणे, सातारा, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा इत्यादी भागांमध्ये पावसाची हजेरी जोरदार बघायला मिळत आहे. यामुळे काही ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झाले आहे तर काही ठिकाणी यामुळे खरीप पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेले आहे आणि काही पिकांना उभारी सुद्धा मिळत आहे.

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच धरणे ही शंभर टक्के क्षमतेने भरली असून आता धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे यामुळे नदीकाठी वसलेल्या गावांमधील गावकऱ्यांना सावधान त्यांचा इशारा देखील देण्यात आलेला आहे राज्यात नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत.

Read  Seeds Safety in Marathi | साठवलेल्या धान्याला अजिबात किडे लागणार नाही, हे करून बघा

महाराष्ट्रात पाऊसाची शक्तता

पावसाबद्दल महाराष्ट्रातील हवामान तज्ञ व आपल्या हवामान अंदाज यासाठी नावाजलेले पंजाबराव ढग यांचे देखील महाराष्ट्रातील पावसाबाबत अंदाज आलेले आहेत ते म्हणतात की, नाशिक जिल्ह्यामध्ये बागायतदारांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पंजाबराव म्हणतात की हवामान अंदाजानुसार आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे यानंतर मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होणार आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये 24 सप्टेंबर पर्यंत पाऊस हा पूर्णतः जाणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्षावलेला आहे. लवकरच नाशिक जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले आहे.

विदर्भ तसेच मराठवाड्यात यावर्षी दिवाळीत पाऊस पडणार असून यावर्षी 28 ऑक्टोबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव ढग यांनी म्हटले आहे

Read  'निवार चक्रीवादळ' हवामान अंदाज पुणे

21 ते 24 सप्टेंबर पर्यंत राज्यात जोरदार पाऊस कोसळणार आहे 7 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात देखील होईल याशिवाय पंजाबराव डक यांनी म्हटले आहे की, दिवाळीमध्ये दोन मोठे पाऊस कोसळणार आहेत विदर्भ तसेच मराठवाड्यात पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे

शेतकरी मित्रांनो ही 9 कागदपत्रे तुमच्याकडे पाहिजेतच

अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा निहाय यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment