IMD alerts in Maharashtra बातमी राज्यात पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान खात्याने केले सावध….
विज्ञानाने प्रगती केल्यामुळे आज आपल्याला दहा दिवसा अगोदर येणारे वादळ असो, आकाशातील एखादा ग्रह पृथ्वीकडे येत असेल किंवा मग पावसाचा अंदाज असो हा आपल्याला कळतो. तेही आपल्या हिताचेच आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हवामान खात्याने केलेले अंदाज. तर चला मग पाहुया ही माहिती काय आहे.
महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यापासून सूर्याच्या तापमानात वाढ झाल्यामुळे पृथ्वीवर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी तापमान खूप जास्त तर कुठे खूपच कमी असे आपल्याला दिसून आले. तसे पाहिले तर जास्तीत जास्त तापमानात वाढ झालेली आपल्याला दिसून आली. दिनांक 3 मार्च रोजी मुंबईतील तापमानात प्रचंड वाढ झाली होती. येथील पारा 37.1 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता.
तेथील नागरिकांना सकाळपासूनच उकाड्याचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर आजही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम आहे. पण विकेंडनंतर दोन दिवस कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे, असे हवामान खात्याने वर्तविली आहे. त्याचबरोबर विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी म्हणजेच 8 मार्च रोजी राज्यात पावस वाढण्याची शक्यता आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.
मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे.
IMD alerts in Maharashtra तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व त्या दिवशी घराबाहेर पडू नये. तसेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.