तुम्हीच तुमच्या जमिनीचे मालक परंतु शेतकऱ्यांसाठी 9 पुरावे महत्वाचे satbara

Satbara-शेतकरी आपल्या शेतीवर आयुष्यभर राबराब राबत असतो आणि जमिनीची निगा पण ठेवत असतो मग ती जमीन वडलोपार्जित असो किंवा स्वतःच्या कष्टाने खरेदी केलेली असो अशा कष्टाने कमावलेल्या जमिनीची कागदपत्रे आपल्याकडे कोणकोणती आहेत हे शेतकऱ्यांना माहिती असणे खूप गरजेचे आहे न्यायालयाच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टीने आपणच आपल्या शेत जमिनीचे मालक आहोत ह्याकरता काही पुरावे म्हणजेच कागदपत्रे आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. जी कमावलेली जमीन आहे, ती आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे तसेच मालकीहक्क शुद्ध करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, तेच या लेखामध्ये आपण जाणून घेऊयात.

मी जी कागदपत्र या लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहे, याबाबत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये अज्ञान असलेले दिसते. आणि म्हणूनच अशा अज्ञानाचा फायदा इतर लोक घेतात.  काही समाजकंटक शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला आणि आर्थिक त्रासाला समोर जावं लागतं आणि त्यामुळेच अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत महाराष्ट्रामध्ये न्यायालयात असे खटले चालू आहेत. ही पाळी आपल्यावर येऊ नये त्याकरिता हा लेख पूर्ण वाचा.

ह्या घटना आपल्यासोबत घडू नये. कोणी आपली जमीन बळकावून नये. याकरता रीतसर कायदेशीर कोणती कागदपत्रे आपण आपल्या जमिनीचे मालक आहोत हे सिद्ध करण्यासाठी लागणार आहेत तेच या लेखांमध्ये पाहूयात.

ही 9 कागदपत्रे आपण जपून ठेवली पाहिजेत किंवा याची लिस्ट बनवून ठेवा जेव्हा जेव्हा आपल्याला काम पडेल तेव्हा लिस्ट मधले नऊ कागदपत्रे आपल्याकडे आहेत किंवा नाहीत हे पाहिल्यानंतरच आपणच आपल्या जमिनीचे मालक आहोत किंवा आपल्याकडे आपल्या जमिनीचा मालकी हक्क आहे हे आपल्याला सिद्ध करता येऊ शकते. एक फाईल बनऊन घ्या, त्यामध्ये खालील कागदपत्रे ठेवा.

Read  तुमच्या ताब्यात असलेली जमीन आणि 7/12 वरची जमीन सारखी आहे पहा मोबाईलवर

1)सातबारा

आपल्या मालकी हक्काची नोंद दरवर्षी योग्यरीत्या केली जाते किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने दरवर्षी आवर्जून सातबाराच्या उतारा ची नक्कल घेऊन मूळ फाईलला लावली पाहिजे जमीन मालकीची झाल्यापासून सर्व सातबारे उतारे या फाईलमध्ये लावल्यास शेतकऱ्याच्या नवीन पिढीला देखील आपले हक्क समजण्यास मदत होईल

2)मालकी विषयी ची कागदपत्रे

यामध्ये आपण कसत असलेली जमीन ही आपल्या मालकीची कशी झाली हे दाखविणारी कागदपत्रे मूळ स्वरुपात प्रत्येक शेतकर्‍याने आपल्याकडे ठेवली पाहिजेत यामध्ये मुख्यत खरेदीचा दस्त म्हणजेच खरेदीखत बक्षीसपत्र चे दस्त मृत्युपत्र किंवा अन्य स्वरुपाचा चे मूळ दस्तऐवज यांचा समावेश होतो जर वडीलोपार्जित जमीन नावावर आली असेल तर प्रत्येक शेतकर्‍याने एका कोर्‍या कागदावर वंशवेल लिहून काढला पाहिजे यामध्ये आजोबांचे नांव त्यांना असणारी एकूण मुले व मुली त्यांच्या मृत्युनंतर झालेल्या वारसाच्या नोंदी कायद्यानुसार आलेला हिस्सा व त्यानुसार किती जमीनीपैकी किती क्षेत्र आपल्या नावावर झालेले आहे हे शेतकर्‍याला समजले पाहिजे यामध्येच सर्व वारसांच्या नोंदी फेरफार नोंदीचे उतारे व वारस ठरावाचे उतारे लावावेत.

Read  जमीन खरेदी विक्री नियम

3)जमीन मोजणीचे नकाशे

ज्या ज्या जमीनी आपल्या मालकीच्या अगर वहिवाटीच्या आहेत अशा जमीनीच्या मोजणीचे नकाशे प्रत्येक शेतकरी जवळ असणे आवश्यक आहे शेजारच्या शेतकर्‍याने अतिक्रमण केल्यानंतर ऐनवेळी धावपळ करुन किंवा अर्जंट मोजणीची फी भरुन गरजेनुसार जमीन मोजण्यापेक्षा आपल्या सर्व जमीनी एकदा रितसर मोजून त्यांचे नकाशे आपल्याजवळ ठेवणे शेतकर्‍याच्या हिताचे आहे.

4)जमिनीचे मूळ टिपण व फाळणी चे उतारे

शासनामार्फत जमाबंदी करतांना राज्यातील सर्व जमीनी मोजण्यात आल्या असून त्यांचे मोजमाप या टिपण पुस्तकात नोंदविलेले असते आपल्या मालकीच्या जमिनीचे मूळ टिपण व फाळणीचे उतारे तालुका निरीक्षक भुमिअभिलेख म्हणजेच मोजणी खात्याच्या कार्यालयाकडून प्राप्त करून घेऊन आपल्या मूळ फाईलला लावावेत या नकला मुळेच जमीनीचे एकूण क्षेत्रफळ लांबी रुंदी समजण्यास शेतकर्‍याला मदत होईल

5)8अ चा उतारा

आपल्या नावावर एकूण कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे हे दर्शविणारा गांव दप्तरातील नमुना म्हणजे 8अ चा उतारा होय जमीन जर खरेदीची असेल तर खरेदी तारखेनंतर घेतलेला 8अ चा उतारा फाईलला लावावा तसेच दरवर्षी शेतसारा भरल्यानंतर 8अ चा उतारा फाईलला लावावा जमीन जर वडीलोपार्जित चालत आलेली असेल तर वडील हयात असतांना त्यांच्या नावावर एकूण किती जमीन होती व आजरोजी आपल्या नावावर किती जमीन आहे हे दाखविणारे दोन्ही 8अ चे उतारे प्राप्त करुन पाहायला लावले पाहिजे.

Read  सातबारा दुरुस्त कसा करायचा? Satbara Kasa Durust karayacha? सातबारा उतारा 2020-21

6)इतर हक्कातील नोंदी विषयक कागदपत्रे

आपल्या मालकीच्या कोणत्याही जमीनीबाबत इतर हक्कांमध्ये काही नोंदी असल्यास त्याबाबतची कागदपत्रे शेतकर्‍यांनी मूळ फाईलमध्ये लावली पाहिजेत यामध्ये मुख्यत सोसायटीच्या कर्जाच्या बोजा च्या नोंदी ज्या करार पत्राच्या आधारे करण्यात त्या इकरार पत्राचा नमुना

7)जमीन महसुलाच्या पावत्या

दरवर्षी जमीन महसूल भरल्यानंतर तलाठी मार्फत दिल्या जाणार्‍या पावत्या हा एक कायद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा पुरावा मानला जातो हा पुरावा शेतकर्‍याने व्यवस्थित सांभाळून व अद्यावत स्वरुपात ठेवला पाहिजे

8)घराच्या मालकी हक्काबाबत चे रेकॉर्ड

शेतकर्‍याने शेतात किंवा अन्यत्र घर बांधले असेल तर त्या घराच्या बाबतीत मिळकतीचा उतारा खरेदी पत्र घरपट्टी भरल्याच्या पावत्या इत्यादी महत्वाची कागदपत्रे देखील या फाईलमध्ये लावावीत

9)पूर्वीचे खटले व त्याविषयीची माहिती

स्वतःचे हितसंबंध असणाऱ्या सर्व जमिनींच्या बाबतीत पूर्वी कोणतीही केस कोणत्याही कोर्टात चालली असेल तर अशा केसची कागदपत्रे त्यातील जमावाच्या प्रति निकाल प्रत इत्यादी कागदपत्रे काळजीपूर्वक जपून ठेवली पाहिजे

Share on:

या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेतीविषयक सर्व चालू घडामोडी तसेच हवामान अंदाज, पिकाविषयी माहिती वाचयला मिळणार आहेत.

Leave a Comment

x