Aapleabhilekh Mahabhumi Shetkaree शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहिजे असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीचे रेकॉर्ड आपल्याला बघायचे असेल तेही 1880 सालापासून चे तर हा लेख तुमच्या करता खूप महत्त्वपूर्ण आहे.
मित्रांनो जमिनीचे जुने रेकॉर्ड किंवा कागदपत्र आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाहीत किंवा ते रेकॉर्ड आपल्याला सापडत नाही अधिकारीही ते दाखवत नाहीत आणि त्यामुळे आपले फक्त सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे होतात. त्यामुळेच आता सरकारने ऑनलाईन पद्धतीने 1880 सालापासून ची जमिनीचे रेकॉर्ड आपणास ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत ते आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर बघता येईल आणि ते डाऊनलोड सुद्धा करता येतील.
आता तुम्हाला अजून हे कागदपत्र बघण्याकरता भूमी अभिलेख कार्यालयात किंवा तहसील मध्ये जाण्याची गरज आहे तुम्ही ते ऑनलाइन बघू शकता प्रथम आपण https://aapaleabhilekh. mahabhumi.gov.in/erecords/Login किंवा
https://115.124.110.74/erecords या लिंक ला क्लिक करून डायरेक्ट पेजवर जाऊ शकता. आपण जर नवीन युजर असाल तर आपल्याला सर्वप्रथम आपणास युजर आयडी आणि पासवर्ड तसेच कॅप्टचा कोड विचारला जातो परंतु आपण जर या अगोदर रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर केले नसले तर आपण new user registration यावर क्लिक करायचे आहे.
रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन चा फॉर्म दिसेल त्यामध्ये आपली स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
रजिस्ट्रेशन फॉर्म वर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे. तयार केलेला लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून पुन्हा तुम्हाला पहिल्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही लॉगीन होऊ शकाल.
आता तुम्हाला जे पहिले पेज उघडले होते ते पुन्हा उघडावे लागेल आणि लॉग इन आयडी ठिकाणी आपण तयार केलेला लोगिन आयडी आहे तो आणि पासवर्ड च्या ठिकाणी आपण पासवर्ड तयार केला असेल तो त्यानंतर एक कॅपच्या कोट दिसेल पाच अंकी तो खाली टाकायचा आहे आणि लोगिन वर क्लिक करायचे आहे.
नंतर तुम्हाला Basic Search यामध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचे गाव आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे ते भरायचे आहे. त्यानंतर गट नंबर असेल सर्वे नंबर असेल किंवा फेरफार नंबर असेल तो टाकायचा आहे सर्च बटनावर क्लिक करायचे आहे. सर्व भरल्यानंतर Search Result तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये वर्षाचे नाव दाखवले जाईल तुम्हाला यापैकी कोणत्या वर्षी चे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट पाहिजे आहे ते add to cart करायचे आहे. म्हणजेच ते डाऊनलोड साठी आपण ते निवडाल. त्यानंतर आपल्याला My Cart च्या खाली Continue ऑप्शन दिसेल. त्यानंतर एक पाप मेसेज दिसेल ज्या मध्ये लिहिलेला आहे की जर ऑनलाइन डॉक्यूमेंट असेल तर तुम्हाला ते डाऊनलोड करता येईल अन्यथा तुम्हाला सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन भेटेल.
Ok केल्यानंतर Continue या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला Download Available File हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे. जर फाईल डाउनलोड झाल्यानंतर झिप फाईल मध्ये आली तर त्याला अनझीप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही pdf स्वरूपात आपले कागदपत्र पाहू शकता. म्हणजेच जुना फेरफार कशा प्रकारचा होता त्यावर काय नोंदी आहेत हे तुम्ही सहज पाहू शकता
What is your good Aap me lagane se you tube channel ID
Hi I’m interested Mi Reply you are doing good name sayad ye sab
Suresh jadhv chawl no. 6 room no 6 meghwadi jogeshwari east mum no. 400060