School Reopen in Maharashtra राज्यांमधील शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे शालेय शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवलेला होता. यामध्ये येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती.
आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे की, येत्या सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहेत. येत्या 24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड पुढे म्हणाल्या की, पालक, शिक्षण तज्ञ आणि समाज माध्यमांद्वारे अनेकांकडून शाळा सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली होती, त्यामुळे या काळामध्ये आम्ही अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यानंतर हा निर्णय घेतलेला आहे.
ज्या ठिकाणी रुग्ण कमी असेल, अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर आणि आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिलेला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नवीन नियमावली
- स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असतील.
- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 डोज घेतले असावेत.
- 24 जानेवारी पासून पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय.
अशाप्रकारे अखेर 20 दिवसांपासून बंद असलेले वर्ग पुन्हा भरवायला हिरवा कंदील मिळालेला आहे.