NPS National Pention Scheme – राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा निवृत्ती नंतरच्या सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे. या योजेनेंतर्गत खातेदारांना मुदतपूर्व देखील पैसे काढता येतात.
एनपीएस’ NPS चे प्रामुख्यने प्रथम श्रेणी (Table 1)आणि द्वितीय श्रेणी (Table 2) असे दोन प्रकार आहेत. जर तुम्हाला मुदतपूर्व पैसे काढायचे झाल्यास द्वितीय श्रेणीमधून अधिक चांगला परतावा मिळू शकतो.
वयाच्या 18 वर्षानंतर कधीही करता येते गुंतवणूक
राष्ट्रीय पेन्शन योजनेची लोकप्रियता वाढत असून, अनेक नागरिक या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याला कितीही रक्कम गुंतवू शकता. या योजेनेचा लाभ खासगी अथवा, सरकारी अशा कोणत्याही कर्मचाऱ्यांना घेता येतो. पेन्शन नियामक PFRDA पीएफआरडीएने सप्टेंबरमध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार व्यक्तीला या योजनेमध्ये वयाच्या 18 व्या वर्षानंतर कधीही गुंतवणूक करता येते. तुम्हाला जर मुदतपूर्व पैसे काढायचे असल्यास तुम्हाला तुमच्या खात्यावर जमा असलेल्या एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम मिळते. तर उर्वरीत रक्कम ही तुम्हाला वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरुपात दिली जाते. दरम्यान या योजनेत जर तुम्ही 5 लाखांपर्यंत रक्कम गुंतवलेली असेल तर वयाचे 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमची सर्व रक्कम खात्यातून काढून घेऊ शकतात. मात्र रक्कम जर 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्यातील 60 टक्के रक्कम ही तुम्हाला काढता येते आणि उर्वरीत 40 टक्के रक्कम ही पेन्शन स्वरुपात दिली जाते.
लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास?
तुम्ही NPS योजनेचे लाभार्थी असाल आणि तुमचा मध्येच मृत्यू झाला तर योजनेचे सर्व लाभ हे नॉमिनीला मिळतात. खात्यातून पैसे पूर्ण काढायचे आहे, की पेन्शनचा लाभ घ्यायचा आहे, हे सर्व निर्णय त्याला घेता येतात. मात्र इथे देखील तोच नियम लागू होतो. जर गुंतवणूक ही 5 लाखांपेक्षा अधिक असेल तर नॉमिनीला देखील 60 टक्केच रक्कम काढता येते. उर्वरती रक्कम ही पेन्शन फंडमध्ये जमा होते.