आज आपण या लेखात आपण आपले ड्रॅविंग लायसन्स online कसे काढू शकता किंवा renew करू शकता हे पाहणार आहोत. आर सी (RC), इन्श्युरन्स (Insurance) आणि वाहनांशी संबंधित अन्य कागदपत्रे रिन्यू करण्याची शेवटची तारीख 30 जून ही आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालया कडून आता ही तारीख पुन्हा वाढवली जाणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तुम्ही तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करु इच्छित असाल तर, काळजी करण्याचं कारण नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आणि ते रिन्यू करण्यासाठी नवी नियमावली सरकारने प्रसिद्ध केली आहे.
त्यामुळे तुम्ही आता घरबसल्या तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकणार आहात.
सर्व प्रक्रिया ऑनलाईन
नव्या नियमावलीनुसार लर्निंग लायसन्ससाठी आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रिंट काढण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक सर्टिफिकेट आणि कागदपत्रांचा वापर मेडिकल सर्टिफिकेट, लर्नर लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर आणि त्याच्या रिन्यूअलसाठी केला जाऊ शकतो.
मिळणार RC रिन्यू करण्यासाठी सवलत
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून लोकांच्या सोयीसाठी नव्या गाडीची रजिस्ट्रेशन प्रक्रियाही सोपी बनवली आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचं रिन्यूअल तुम्ही 60 दिवस आधी करु अॅडव्हान्समध्ये करु शकणार आहात. त्याचबरोबर टेम्पररी रजिस्ट्रेशनसाठी वेळीची मर्यादाही आता 1 महिन्यावरुन वाढवून 6 महिने करण्यात आली आहे.
ड्रायव्हिंग टेस्टसाठी RTO कार्यालयात जावे लागेल काय?
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने Learner’s License साठीच्या प्रक्रियेतही काही बदल केले आहेत. यामध्ये आता ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्हाला RTO कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही ट्युटोरियलच्या(Tutorials) माध्यमातून घरबसल्याही करु शकणार आहात. कोरोना काळात संबंधित मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.
वाहन परवाना रिन्यू (Renew) करण्यासाठी काय आहे पद्धत ?
1) ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाची अधिकृत वेबसाईट https://parivahan.gov.in/parivahan/ यावर जा
2) इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन (online) पर्यायावर क्लिक करा.
3) यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ ( services on driving license )वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
4) अर्जामध्ये दिलेली माहिती संपूर्ण भरा. कागदपत्रंही जोडा.
5) अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतर ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
6) यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल.
Source:TV9Marathi
Drive licence tr
Pandit tulashiram dhum
At devipada
Post umbarthan
Tel suragana
Nashik
Pandit tulashiram dhum
At devipada
P post umbarthan
Tel suragana
Nashik
A am vishvjeet suryvanshi draving laasans 4 ville
jdamodar495@gmail.com
लायसन्स मिळने बाबत
Driving license 2 wheeler
Driving license kadhayche aahe
Draving lassans 2 ville
Driving licence