मित्रांनो आपल्याला आपल्या जवळ असलेले पॅन कार्ड खरे आहे का बनावटी PAN card true or false? हे शोधून काढता येते. आम्ही सांगितलेल्या टिप्स आपण जर फॉलो कराल तर आपल्याला आपले पॅन कार्ड काही मिनिटांमध्ये शोधून काढता येईल.
PAN card true or false? कार्ड खरी आहे का बनावटी कसे शोधावे?
Table of Contents
बँक असो किंवा इतर आर्थिक महत्त्वाचे काम असो आपल्याला त्याकरता पॅन कार्ड आवश्यकच आहे पण आजकाल पेन क्रमांकाचा देखील गैरवापर होत असलेला दिसतो त्यामुळे आपली फसवणूक देखील होऊ शकते. आपण फसवणुकीचे शिकार होऊ नये म्हणून काही दक्षता बाळगणे खूप आवश्यक आहे आजकाल बनावट पॅनकार्डचा ट्रेन सुरू आहे. त्यामुळे आपण वापरत असलेले पॅन कार्ड हे खरे आहे का बनावटी हे शोधून काढणे आवश्यक आहे आणि ते आपल्याला माहिती नसते. आपल्याला घाबरण्याचे कुठलेही कारण नाही, आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर काही मिनिटात आपण ते शोधून काढू शकता. त्याकरता आपल्याला काही टिप्स फॉलो करावे लागतील.
पॅन कार्डची सत्यता कशी तपासावी?
A) सर्वात प्रथम आपल्याला आयकर विभागाच्या ई-फायलिंग ncometaxindiaefiling.gov.in वेबसाईटवर जावे लागेल तिथे लॉगिन परा.
B) या वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला ‘आपले पॅन तपशील सत्यापित करा’ या लिंक वर क्लिक करायचे आहे.
C) तिथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड चा तपशील टाकायचा आहे तुमचे पॅन नंबर पॅन कार्ड धारकाचे संपूर्ण नाव तुमची जन्मतारीख भरावी लागेल.
D) तुमची माहिती अचूक भरल्यानंतर पोर्टल वर एक संदेश येईल की, भरलेली माहिती तुमच्या पॅन कार्डची जुळली किंवा नाही, जर माहिती बरोबर असेल, तर तुम्हाला पॅन कार्ड ची सत्यता शोधली आहे, असा त्याचा अर्थ होईल म्हणजे तुमच्या पॅन कार्डशी माहिती जुळली आहे आणि ते तुमचेच आहे बनावटी नाही.
पॅन कार्डची सत्यता का पडताळून पहावी?
आपण बघतो की Lockdown नंतर बर्याच लोकांना बनावटी पॅन कार्ड PAN Card लुबाडन्यात आले आहे. किंवा त्यांची फसवणूक केली गेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपले पॅन कार्ड हे सत्य आहे किंवा नाही हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. म्हणून आपण आयकर विभागाच्या वेबसाईटवर ते सहज शोधू शकता. आयकर विभाग आपल्याला दहा अंकी ओळख क्रमांक जारी करतो. त्या आधारे त्या व्यक्तीची आर्थिक माहिती आयकर विभागाला शोधणे सोपे जाते. जसे की आपण मालमत्ता खरेदी करतो, बँकेचे व्यवहार करतो, विक्री करतो, कार खरेदी करतो किंवा आयकर भरतो हे सर्व आपण पॅन कार्ड मुळे करू शकतो. एखाद्या व्यक्तीची जास्त संपत्ती असली तर ती पॅन कार्ड द्वारे आयकर विभागाला सहज समजू शकते. त्यामुळेच प्रत्येक नागरिकाला PAN Card महत्त्वाचे आहे.
म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पॅन कार्ड द्वारे कोठेकठे व्यवहार केले आहेत, हे आयकर विभागाला सहज समजते त्यामुळेच पॅन कार्ड जास्त रकमेच्या व्यवहाराच्या वेळी वापरण्यास सांगितली जाते. बँकेचे सर्व व्यवहार पॅनकार्ड वरच अवलंबून असतात.
पॅन कार्ड करता कसा अर्ज करावा?
पॅन कार्ड बनवून घ्यायचे असेल तर प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करता येते आणि तिथून तुम्ही तुमचे पॅन कार्ड मिळू शकता. पॅन कार्ड आपल्या घरपोच येते कोठेही जाण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही घरी बसून PAN Card मिळू शकता. याकरता तुम्हाला तुमचा आधार कार्ड जवळ असणे गरजेच आहे. ज्यामधून ओटीपी जनरेट होईल आणि काही मिनिटात तुम्हाला ई पॅन कार्ड ePancard देण्यात येईल.
तर मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की आपले पॅन कार्ड खरे आहे का बनावटी PAN card true or false. तुम्ही आमच्या मराठी स्कूल Marathi school आणि बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉगला अवश्य भेट द्या.
amolj