शेतकरी मित्रांनो खरीपाचे पीक कर्ज Pik Karj वाटप सुरू झालेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने crop loan online application तर काही जिल्ह्यांमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येत असून पीक कर्ज वाटप केल्या जात आहे. मात्र हे पीक कर्ज वाटप होत असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी आहेत की, पीक कर्ज वाटप आणि पिकांना अल्प दर मिळत आहे.
Pik Karj कोण्या पिकाला किती मिळेल पिक कर्ज
Table of Contents
पिक कर्ज Pik Karj आहे किती दराने दिल्या जावे त्याकरता काही नियम आहेत का? किंवा अटी आहेत का? तर मित्रांनो हो नक्कीच ह्या करता काही नियम व अटी आहेत.
पिकाकरता, मत्स्यपालन करता किंवा जनावरांकरता किती कर्ज दिले जाते?, याचे वेगवेगळे नियम आहेत. शेतकरी मित्रांनो पीक कर्जाचे दर निश्चित करण्यासाठी एक जिल्हास्तरीय समिती असते. या माध्यमातून उत्पादन, त्या-त्या जिल्ह्यामध्ये असणाऱ्या पिकांच्या समस्या, हे सर्व पाहून त्या जिल्ह्यातील पीक कर्जाकरिता Pik Karj निर्णय घेतले जातात.
हे निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक आढावा राज्यस्तरीय समितीला दिला जातो. ज्यामध्ये राज्याचे सहकार आयुक्त हे प्रमुख असतात. मात्र मित्रांनो 2020मध्ये नाबार्डने ठरवून दिलेल्या नियमानुसार कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी. असे निर्देश देण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे व कोरोनामुळे 2021 ची ही बैठक 8 मार्च 2021ला घेण्यात आली. त्या बैठकीतील इतिवृत्त आपण पाहूया.
पीकनिहाय कर्ज दरात वाढ करणेबाबत व कर्ज दरात एकसूत्रता आणणेसाठी राज्यस्तरीय बैठक समितीची सभा 8 मार्च 2021 चे इतिवृत्त
दिनांक पाच मे दोन हजार चौदा अन्वये सोंग 2021 – 22 साठी पीकनिहाय कर्ज दर निश्चित करणे व पीक कर्ज दरात एकसूत्रता आणण्यासाठी गठीत केलेल्या समितीची सभा दिनांक 8 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता माननीय सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांचे अध्यक्षतेखाली माननीय सहकार आयुक्त कार्यालय पुणे यांचे सभागृहात पार पडली.
राज्यस्तरीय समितीने सन 2021-2022 करिता सुचवलेले किंवा निश्चित केलेले पीकनिहाय पिक कर्ज दर
पिक हेक्टरी दर
खरीप भात सुधारित. 58000
भात उन्हाळी/बासमती 61000 खरीप भात जिरायती 42000 खरीप ज्वारी बागायत 29000 खरिप ज्वारी जिरायत 27000 बाजरी बागायत. 30000 बाजरी जिरायत. 24000 बाजरी उन्हाळी. 26000 मका बागायती. 36000 मका जिरायची. 30000 मका स्वीट कॉर्न. 28000 तूर बागायत. 40000 तूर जिरायती 35000 मूग जिरायत 20000 मुग उन्हाळी 17000 उडीद जिरायती 20000 भुईमूग बागायत उन्हाळी. 44000 भुईमूग जिरायत 38000 सोयाबीन. 49000 सूर्यफूल बागायत 27000 सूर्यफूल जिरायत 24000 जवस जिरायत 25000 कापूस बागायत 69000 कापूस जिरायत 52000 ऊस आडसाली 132000 ऊस पूर्वहंगामी 126000 ऊस सुरू 126000 ऊस खोडवा 99000
रब्बी उन्हाळी पिके Summer Cropपिके. प्रती हेक्टरी रब्बी ज्वारी बागायत 33000 रब्बी ज्वारी जिरायत 31000 गहू बागायत 38000 हरभरा बागायत 40000 हरभरा जिरायत 35000 करडई 30000 भाजीपाला पिके Vegetable 🥒🍆पिके. प्रती हेक्टरी मिरची 75000 मिरची निर्यातक्षम 90000 टोमॅटो 80000 कांदा खरीप 65000 कांदा रब्बी 80000 बटाटा 75000 हळद. 105000 आले 105000 कोबीवर्गीय पिके 42000 फुल पिके Flowers Crop Loanपिके. प्रती हेक्टरी ओस्टर 36000 शेवंती 36000 झेंडू 41000 गुलाब 47000 मोगरा 42000 जाई 38000 फळझाडे Fruit 🍑🍓पिके. प्रती हेक्टरी द्राक्ष 320000 काजू 121000 डाळिंब 130000 चिकू 70000 पेरू 66000 कागदी लिंबू 70000 नारळ 75000 सीताफळ 55000 केळी 100000 केळी टिश्यू कल्चर 140000 संत्रा मोसंबी 80000 आंबा हापूस 155000 बोर 40000 पपई 70000 चारा पिकेपिके. प्रती हेक्टरी गजराज 32000 लसुन गवत 63000 पवना गवत. 34000 मका हिरवा चारा 32,000 बाजरी हिरवा चारा 16000 ज्वारी हिरवा चारा 22000 इतर पिके Other Cropपिके. प्रती हेक्टरी रेशीम तुती 90000 पानमळा 55000 अशा प्रकारे वरील प्रमाणे शासनाने पिकांचे दर निश्चित केलेले आहेत. यापेक्षा कोणतीही बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज pik karj कमी दराने देऊ शकत नाही. यापेक्षा शेतकऱ्यांना अधिकचा दर पाहिजे असल्यास जिल्हा स्तरीय समिती त्यावर निर्णय घेऊ शकते. टीप – उपरनिर्दिष्ट पीक कर्ज तर हे मार्गदर्शक तर असून त्यापेक्षा कमाल दहा टक्के वाढीव दर ठरविण्याबाबत जिल्हा तांत्रिक समिती मुभा आहे तथापि शक्यतो वरील दरापेक्षा कमी दर असू नयेत. |
आमच्या आई मराठी ब्लॉग ला अवश्य भेट द्या